तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी, सहकार वंचित, महाविकास आघाडीचे वर्चस्व......

तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी, सहकार वंचित, महाविकास आघाडीचे वर्चस्व......
शेतकरी सहकार वंचित महाविकास आघाडीला १० जागा, शेतकरी-भाजप पॅनलला ६ जागा...

तेल्हारा प्रतिनिधी.....
 सहकार क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी तेल्हारा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीचा निकालाचे चित्र रविवारी रात्री उशिरा स्पष्ट झाले . रात्री उशिरापर्यंत निकालाचा गोंधळ सुरू होता. बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी सहकार पॅनल, वंचित बहुजन महाविकास आघाडी वरचष्मा दिसून आला. शेतकरी सहकार पॅनलला १० जागा मिळाल्या तर शेतकरी-भाजप पॅनलला ६ जागांवर समाधान मानावे लागले. दोन जागांवर अपक्ष निवडून आले. रविवारी रात्री उशिरापर्यंत गोंधळाची स्थिती आणि काही उमेदवारांनी मतमोजणीवर आक्षेप घेतल्यामुळे विजयी उमेदवारांचे निकाल जाहिर करण्यात आले नव्हते. परंतु प्राप्त वृत्तानुसार शेतकरी सहकार पॅनल, वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीचे रविंद्र बिहाडे यांनी 262 मते मिळवून प्रतिस्पर्धी विशाल कोकाटे यांना 30 मतांनी पराभूत केले , श्याम घोंगे यांना 243 मते मिळवून धनगर समाजाचे दिग्गज नेते व जिनींग व कॉटन मार्केटचे संचालक निळू बचे यांचा 53 मतांनी पराभव केला , सुनील इंगळे यांना 258 मते मिळवून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रमेश दाऱोकार यांना चारही मुंड्या चित करून 22 मतांनी धूळ चारली ., महिला गटातून विजया शंकरराव ताथोड यांना 232मते मिळाली तर प्रतिस्पर्धी विजया विश्वभंर ताथोड यांना 31 मतांनी पराभूत केले , वंदना वाघोळे यांना 222 मते मिळाली असून इंदुताई गेबड यांना 35 मतांनी पराभूत केले , डॉ. अशोक बिहाडे यांनी 199 मते मिळवून विजयी तर , गौरव यादगिरे 200 मते मिळवून विजयी , प्रा. प्रदीप ढोले 207 मते मिळवून विजयी , दामोदर मार्के 205 मते मिळवून विजयी ,मोहन पाथ्रीकर 245 मते मिळवून केवळ 1 मताने देवानंद नागळे यांना पराभूत केले . परंतु त्यांचे निकाल जाहिर करण्यात आले नव्हते. तसेच शेतकरी भाजप पॅनलचे संदीप खारोडे236 मते मिळवून विजयी , शांताराम काळे221 मते मिळवून विजयी , पुंडलिक अरबट222 मते मिळवून विजयी , हरिदास वाघ197 मते मिळवून विजयी , सुभाष खाडे 172 मते मिळवून विजयी , लखन राजनकर 261 मते मिळवून विजयी तर अपक्ष म्हणून व्यापारी/अडते मतदारसंघातून हरिश तापडिया आणि राजु टेकडीवाल निवडून आले आहेत. सर्वाधिक उमेदवार शेतकरी सहकार वंचित महाविकास पॅनलचे निवडून आले 



दोन उमेदवार एक-एक मताने विजयी



शेतकरी-भाजप पॅनलचे हरिदास वाघ आणि शेतकरी सहकार पॅनलचे मोहन पाथ्रीकर हे दोघेही केवळ एक-एक मताने निवडून आल्यामुळे त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी फेर मतमोजणी मागणी केली. त्यामुळे गाेंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

उपस्थित रॅली मध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे, ओबीसी नेते ऍड. संतोष राहाटे, गजानन गवई, माजी जि. प. अध्यक्ष प्रतिभाताई भोजने ,विद्यमान अध्यक्षा संगीताताई अढाऊ, माजी महिला आघाडी अध्यक्षा संतोषीताई निखाडे, गोपाल कोल्हे, प्रमोदिनी कोल्हे, वंचित ता. अध्यक्ष अशोक दाऱोकार, सहकार नेते सुरेशदादा तराळे, शिवसेना ता. अध्यक्ष अजय गावंडे, सुधाकर येवले, सुभाष रौंदळे, गटनेते संजय हिवराळे, पं,सं. सदस्य अण्णा मोहोळ,प्रदीप तेलगोटे, मनीष राहाटे,जीवन बोदळे,सैफुला‌खा, विकास पवार, विकास दामोदर, आनंद ‌बोदडे, प्रसिद्धी प्रमुख सिद्धार्थ गवारगुरू, पंजाब तायडे सुनील तायडे, युवक अध्यक्ष जिया शहा , महासचिव संदीप‌ गवई, सुज्ञान खंडेराव, मिलिंद इंगळे,तथा सर्व शेतकरी सहकार वंचित प्रफुल मोरे, शेख याशिन, जाफर खा, इत्यादी वंचित बहुजन आघाडी, सहकार, शेतकरी,महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आवर्जून उपस्थिती लावली होती 


Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे