∆बार्शीटाकळीतील प्रधानमंत्री आवास योजनेला ब्रेक..... ∆घरकुल लाभार्थ्यांचे जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी यांना निवेदन.........
∆बार्शीटाकळीतील प्रधानमंत्री आवास योजनेला ब्रेक...
∆घरकुल लाभार्थ्यांचे जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी यांना निवेदन.......
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री योजनेमुळे गरीब व बेघर लोकांना योजनेच्या माध्यमातून घरे दिली जात आहेत.परंतु शहरातील नगरपंचायती मध्ये ही योजना रखडल्याचे दिसत आहे.कारण अनेक प्रधानमंत्री घरकुल योजनेचे लाभार्थी यांनी नगर पंचायतीकडे धावाधाव करून थकले आहेत.अजूनही या योजनेचे काम होताना दिसत नाही.त्यामुळे नगरच्या घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रधान मंत्री घरकुल योजनाचा पहिला टप्पा देण्याची मागणी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, सुमारे 2 ते 3 महिन्यांपूर्वी नगर पंचायतीकडून लाभार्थ्यांना बांधकाम परवाना देण्यात आला आहे. अद्यापपर्यंत घरकुलाचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. . अनेक लाभार्थ्यांनी घरे बांधण्या करीता वैयक्तिक कर्ज घेऊन प्लिंथचे काम केले आहे. पण त्यांना अद्याप ही घरकुलाचा पहिला हप्ता मिळाला नाही.तत्काळ त्या लोकांच्या खात्या मध्ये पहिला हप्ता जमा करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली आहे. हा निवेदन मो.रिजवान (बाबा) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी, मुख्यधिकारी व नगराध्यक्ष यांना देण्यात आला आहे.न तिवेदन देता वेळी शेख अकलीम, शेख अकील, वसीम खान, मो.शोएब, शब्बीर खान, शेख मुनीर, शेख लतीफ, कल्पना धुरंधर , समरीन परवीन , आशिक खान , अब्दुल रफिक , महेमुद खान , फयाजोदिन , जाबीर खान , सुरेश जामनिक , मोहम्मद. शकील आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment