स्वच्छ, चारित्र्य संपन्न युवक घडवण्याची ताकद बाल संस्कार शिबिरातच!.. समाजसेवक गजानन हरणे.
स्वच्छ, चारित्र्य संपन्न युवक घडवण्याची ताकद बाल संस्कार शिबिरातच!.. समाजसेवक गजानन हरणे.
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या विचाराने तरुण युवक प्रेरित झाला पाहिजे यासाठी गुरुदेव सेवा मंडळाचे शेख गुरुजी जिल्हा भर बालसंस्कार शिबिर घेत असून या शिबिरातूनच स्वच्छ व चरित्र संपन्न तरुण युवक घडवण्याची ताकद असल्याचे प्रतिपादक गजानन हरणे ज्येष्ठ समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जण आंदोलन यांनी बार्शिटाकळी तालुक्यातील राहीत येथे बालसंस्कार शिबिराला मार्गदर्शन करताना केले. स्थानिक श्रीसंत बाबूजी महाराज सेवा आश्रम राहित येथे दिनांक १ मे ते २५ मे 2023 पर्यंत गुरुदेव सेवा मंडळ यांच्यावतीने गुरुवर्य माननीय शेख गुरुजी यांच्या मार्गदर्शनात बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराला प्रमुख वक्ते म्हणून गजानन हरणे ज्येष्ठ समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जन आंदोलन हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आश्रमाचे अध्यक्ष मोहन देशमुख हे होते.
प्रमुख उपस्थितीमध्ये रामभाऊ सपकाळ, अतुल देशमुख, गौरवनाथ चिलपते, राजू कुसदकार, नाना देशमुख, शेख गुरुजी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते, सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचार पिठाचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने समाजसेवक गजानन हरणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते गजानन हरणे यांनी व्यसनमुक्ती, सुसंस्कार, लहान मुलांच्या मानवी मेंदूचा वरील परिणाम, समाज ऋण,त्याग, स्वच्छ व चरित्र संपन्न युवक घडवण्यासाठी अनेक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले तसेच शेख गुरुजी हे जिल्हा भर बालसंस्कार शिबिर घेऊन युवकांवर जे चांगले संस्कार करीत आहे त्यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन अतुल देशमुख तर आभार प्रदर्शन शेख गुरुजी यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील तरुण युवक तसेच गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप शिबिरार्थींना प्रमाणपत्र वाटून करण्यात आला.
Comments
Post a Comment