बार्शिटाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींनी पदभार स्वीकारला....

बार्शिटाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींनी पदभार स्वीकारला....

बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : नुकतेच आज बार्शिटाकळी कृषी बाजार समितीमध्ये सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली, त्यात सभापती पदासाठी शेतकरी संघर्ष समिती पॅनलचे राजू काकड पाटील तर उपसभापती पदासाठी सतीश गावंडे यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर आज सोमवार 29 मे रोजी दुपारी अकोला ते महान रोड स्थित बार्शिटाकळी बाजार समिती कार्यालयात पदग्रहण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते उपाध्याय साहेब, आमदार हरीश भाऊ पिंपळे, बार्शीटाकळी नगर पंचायतचे नगराध्यक्ष हाजी महेफुज खान रसुल खान, विशाल भाऊ गावंडे, रमेश आप्पा खोबरे, रमेश बेटकर, गजानन मानतकर, संदीप चौधरी, रमेश वाटमारे, व पुष्पा ताई रत्नपारखी उपस्थित होते.या वेळी उपस्थितांनी राजू काकड पाटील व नवनियुक्त उपसभापती सतीश गावंडे यांचया भावी वाटचालीसाठी अभिनंदन केले.यावेळी आमदार हरीश पिंपळे यांनी मनोगत व्यक्त केले.या वेळी मोहम्मद सादिक लिडर, गोपााल वाटमारे, राठोड साहेब, झडके साहेब, गोल्डे साहेब, जाधव ताई, महैफुजुल्ला खान, प्रवीण धाईत,अनंता केदारे,आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अशोक राठोड माजी जि.प.सदस्य यांनी केले तर आभार प्रदर्शन नवनियुक्त उपसभापती सतीश गावंडे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे