आंळदा ग्रामदान मंडळ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी.....
आंळदा ग्रामदान मंडळ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी.....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी: आज दि.31/05/2023 रोजी शासन निर्णय नुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ग्राम दान मंडळ आळंदा येथे सामाजिक तसेच महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या कर्तबगार ,अशा महिला की त्यांनी गावात बचत गटामार्फत गावात वेगवेगळे कार्यक्रम राबविले असतील जसे महिलांचे जास्तीत जास्त उद्योग स्थापन करणे. महिला सक्षमीकरण बाबत वेगवेगळे कार्यक्रम राबविने आरोग्य शिबीर राबविणे. परसबाग यावर काम करीत असलेल्या महिलांना. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार ग्रामदान मंडळ मार्फत दोन महीलांची निवड करण्यात आली आहे. करीता या कार्यक्रमात मा.दत्ता भाऊ ढोरे अध्यक्ष ग्राम दानमंडळ यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. विश्वनाथ जानोरकार उपसरपंच, स्वाती ऊंबरकार ग्राम सचीव , तसेच महादेव मोहोड, सुकेशनी प्रवीण मोहोड, आशा वर्कर, विणा मोहोड सहयोगीनी माविम,सिमा सोनोने आय सी आर पि, सागर दिलीप मोहोड, अनिल शंकर नवलकार, ज्ञानेश्वर श्रावण सुलताने, महादेव सोनोने, आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा करण्यात आला..
Comments
Post a Comment