ऑड बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान सप्ताहाचे आयोजन....
अकोट शहर... वंचित बहुजन आघाडी अकोट शहर व तालुक्याच्या वतीने, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी गावामध्ये जाऊन, प्रत्येकी कुटुंबाला ताडपत्रीचे वितरण करण्यात आले, आणि विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, जि प अध्यक्ष सौ संगीता ताई आढाऊ ,दीपक बोडखे ,प्रदीप वानखडे , काशीराम साबळे, चरण इंगळे ,सुनीता हीरोडे, रोशन पुंडकर, विशाल आग्रे ,संजय कासदे ,सदानंद तेलगोटे ,मुरली तेलगोटे ,संतोष गाय गोले, भाऊराव धांडे ,दिनेश सरकटे , लखन इंगळे ,आशिष रयबोले, नितीन तेलगोटे, यांच्या सह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment