विद्युत देयक अपडेट नसल्याचे सांगून ७७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल........

विद्युत देयक अपडेट नसल्याचे सांगून ७७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल........
∆नागरिकांनी अशा फसव्या लिंकला प्रतिसाद देऊ नये असे आवाहन बार्शिटाकळी पोलिसांनी केले आहे.....
∆Bill update b.apk नावाच्या लिंकवरून फसवणूक करण्यात आली......

बार्शिटाकळी प्रतिनिधी (श्रावण भातखडे)
बार्शिटाकळी येथील श्रीराम हेमंत नाघाटे यांच्या भारतीय स्टेट बँक खाते महत्व 9 एप्रिल 2023 सविस्तर वृत्त असे की फिर्यादीचे मामा एकनाथ गोल्डे यांच्या मोबाईलवर व्हाट्सअपवर मिनिस्टर ऑफ पाॅवर असा उल्लेख व त्यावर राजमुद्रा अंकित असलेला मॅसेज आला. त्यामध्ये तुमचे मागील महिन्याचे बिल अजूनही अपडेट झाले नसल्यामुळे, विद्युत पुरवठा खंडित होईल त्यासाठी तुम्ही ०९८८३१२७८०४  या हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क साधावा सदर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. सदर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क केला असता कॉल घेतला नाही. 
नंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास तिकडून कॉल आला त्यांनी सांगितले की तुमचे बिल अपडेट झालेले नाही त्यासाठी त्यांना व्हाट्सअप वर एक लिंक पाठवण्यात आली त्यावर तीन रुपये पेमेंट करायला सांगितले सदर लिंक चा वापर करून गुगल पे द्वारा केंद्र पाठवले तीन रुपये डेबिट झाल्याचा संदेश प्राप्त झाला सायंकाळी ७ वाजून ४७ मिनिटांनी ४९ हजार ९९९ रुपये , दुस-या वेळेस ९हजार ९९९रूपये व तिसऱ्यांदा १० हजार रूपये असे एकूण ७६ हजार ९९८ रुपये काढून संबंधी इसमाची फसवणूक केली या फसवणुकीची तक्रार बार्शिटाकळी पोलीस स्टेशनला केली असता पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम भादंवि कलमानुसार ४२० सह ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास बार्शिटाकळी पोलीस करीत आहेत 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे