बार्शिटाकळी न.पा.कार्यालयात कर्मचारी,अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे....
बार्शिटाकळी न.पा.कार्यालयात कर्मचारी,अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
मंगळवार, 23 मे रोजी बार्शीटाकळी येथील नगरपंचायत कार्यालयातील कर्मचारी हजर नसल्यामुळे कार्यालयातील रिकाम्या खुर्च्या कार्यालयाची शोभा वाढवत आहेत.
बार्शिटाकळी येथील मुख्याधिकारी यांच्याकडे दोन ठिकाणी चे पदभार असल्यानेयाचा गंभीर परिणाम नागरिकांना भेडसावत आहे. ग्रापंचायतींची नगर पंचायत झाली तेव्हा पासूनच शहराच्या न.प.ला कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची गरज आहे, मात्र शहराच्या न.प.मध्ये वारंवार होणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्यामुळे गावाचा विकास जैसे थे झाला आहे. याकडे प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही. शहरातील शासकीय व खासगी कामांसाठी कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना अनेक वेळा नगर पंचायत चया चकरा मारायला भाग पडत आहे. या कडक उन्हात आलेल्या नागरिकांना अधिकार्यांना न भेटताच परत जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. या गंभीर समस्येकडे संबंधित प्रशासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्याचे लक्ष वेधून कायमस्वरूपी मुख्याधिकारी न.प. ला देऊन नागरिकांना होणारा त्रास दूर करावा अशी रास्त मागणी बार्शी टाकळी येथील सुज्ञ नागरिक करत असून कार्यालयातील लेट.लतीफ कर्मचार्यांवर कारवाई करावी व शहरातील न.प.मध्ये बायोमेट्रिक मशिन बसवून कर्मचाऱ्यांची हजेरी लावण्याची व्यवस्था करावी अशी मागणी शहरातील नागरिक करत आहेत. ,
Comments
Post a Comment