∆बार्शिटाकळीचा वादग्रस्त पेट्रोल पंप संचालकावर गुन्हा दाखल..... ∆हलगर्जी पणा भोवला.....
∆बार्शिटाकळीचा वादग्रस्त पेट्रोल पंप संचालकावर गुन्हा दाखल.....
∆हलगर्जी पणा भोवला.....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी बायपास टि पाईंट वरील इंडीयन आईलचे डिझेल आणी पेट्रोल पंप आहे त्यांचे संचालक नवीन प्रकाश परमसिंह ठाकुर हे असुन या पेट्रोल पंप वर दिनांक 29/5/2023 रोजी रात्री अंदाजे 8.30 वाजता पेट्रोल पंपा वर पेट्रोल भरण्यासाठी आपली मोटार सायकल घेवून गेले व पंपा वरील मजुर महेश राठोड़ याला 100 रुपयांचे पेट्रोल मागीतले व तेथील मजुराने मोटार सायकल मध्ये पेट्रोल भरत असतांना पेट्रोल पंपाचे नोझल मधून नोझल लिकेच असतांना आणी त्याला कापड बांधलेल्या अवस्थेत असतांना मोटार सायकल मध्ये पेट्रोल भरत असतांना लिकेच नोझल मधून पेट्रोल उडवून मोटार सायकलचे समोर बसलेल्या 3 वर्षीय मुलांचे अंगावर , तोंडावर, डोळ्यात, नाकात पेट्रोल गेला त्याला लगेच रुगणालयात नेले या बाबत बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे बिट जमादार राजेश रामराव जोंधरकर यांचे फिर्यादी वरून पोलीस स्टेशन बार्शिटाकळी मध्ये कलम २८५ भारतीय दंड संहिता प्रमाणे व इतर विविध कलमां नूसार पेट्रोल पंप संचालक नवीन प्रकाश परमसिंह ठाकुर याचे वर गुन्हा दाखल करण्यात आला आणी पुढील तपास बार्शिटाकळी चे ठाणेदार श्री संजय सोळंके साहेब यांचे मार्गदर्शन मध्ये जमादार राजेश जोंधरकर , पोलीस कांस्टेबल पंकज पवार , पोलीस कांस्टेबल नागसेन वानखडे हे करीत आहे .
Comments
Post a Comment