शिवमहापुराण कथा स्थळी चोरी ; दहा महिलांना अटक३२ ग्रॅम सोने जप्त, स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई...

शिवमहापुराण कथा स्थळी चोरी ; दहा महिलांना अटक
३२ ग्रॅम सोने जप्त, स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई...

बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : पातुर रोडवरील मैसपुर येथे सुरू असलेल्या शिवमहापुराण कथा, श्रीमद् भागवत कथा यज्ञाच्या ठिकाणी महिला चोरट्यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या कडुन ३२ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. जेरबंद केलेल्या १० महिलांमध्ये महाराष्ट्रासह अन्य राज्यातील आरोपींचा समावेश आहे.
पंडीत प्रदिप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेला शुक्रवार ५ मे रोजी प्रारंभ झाला. शिवमहापुराण कथा श्रवनासाठी राज्यातुन लाखोंच्या संख्येने महिला भाविक येत आहेत गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या महिलांची टोळीच सक्रिय झाली असून बार्शीटाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महिलांना अटक केली त्यात आशा हिरालाल धोबी , मंजुदेवी राजू धोबी , चंदा सोनू धोनी ,अनिता सुरेश धोबी (सर्व राहणार रेल्वे स्टेशन जवळ नागपूर ) कमलेश सुरजलाल बावरिया , शशी रिंकू बावरिया , कश्मीरा हीरालाल बावरिया (सर्व राहणार रंजीत नगर भरतपुर राजस्थान ) प्रिया संदीप उन्हाळे,  सूरया रामप्रसाद लोंढे राहणार सावंगी मेघे जिल्हा) वर्धा आणि लता किसन सापते राहणार भीम नगर इंदोर मध्य प्रदेश यांचा समावेश आहे दरम्यान या चो-याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे

तीन महिलांच्या तक्रारी 

बार्शिटाकळी पोलीस ठाण्यात शनिवारी ६ मे रोजी महिलांनी फिर्याद दिली होती 
१) अश्विनी अमित जुनारे वय २९ राहणार शास्त्रीनगर अकोला यांनी सोन्याचे एकूण एक लाख वीस हजाराचे दागिने लंपास झाल्याची तक्रार दिली होती 
दुसरी फिर्याद २)अर्चना डिगंबर देशमुख राहणार नांदुरा, जिल्हा बुलढाणा यांनी दिली होती त्यांचे सतरा हजाराचे सोन्याचे दागिने चोरी झाले तसेच 
३)मानसी अमित मुरारका राहणार न्यू राधाकिसन प्लॉट अकोला यांनी पोलीसात तक्रार दिली आहे त्यांची ९० हजाराची मिनी पोत व अन्य सोन्याचे दागिने लंपास झाले ते फिर्याद दिली आहे

चोरट्याकडून दागिने जप्त

 म्हैसपूर येथील शिव महापुराण कथा संपल्यानंतर जेवणासाठी जाणाऱ्या महिलांच्या गर्दीचा फायदा घेत सण साखळी चोरी करताना राज्यातील आणि बाहेर राज्यातील एकूण दहा महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले पोलिसांनी त्यांची कसं चौकशी केली असता महिला पोलिसांकडून आरोपीची धरती घेण्यात आली त्यात मनी डोरलेचे जोड दोन मनी मंगळसूत्र अंदाजे 32 ग्राम आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे