ग्रामीण रुग्णालयात जागतिक तंबाखु विरोधी दिवस साजरा....

ग्रामीण रुग्णालयात जागतिक तंबाखु विरोधी दिवस साजरा....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी येथे 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली सदर कार्यक्रमाचे मुंख्य मार्गदर्शक ग्रामिण रुग्णालय बार्शिटाकळीचे वैधकीय अधिक्षक डॉ महेश राठोड होते  आज आपण सर्व सार्वजनिक ठिकानी पाहतो नागरिका मध्ये तंबाखु व्यसनाचा कल वाढला आहे त्या बदल यावेळेस तंबाखुने होणारे आजार जसे की मुखाचा , अन्ननलिकेचा , फुफुसांचा कर्करोग , उच्च रक्तदाबामुळे हजारो नागरिक  या आजाराचे बळी पडत आहे त्यामध्ये सध्या युवा वर्ग तंबाखु व्यसनाच्या जास्त आधीन आहे त्यासाठी तंबाखुचे  व्यसन जिवघेणे असून त्या   तंबाखु - व्यसन  पासून नागरिकांनी कोषो दुर रहावे अशी माहिती  रुग्णांना व कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली त्यावेळी सर्वाना सुचना करून तंबाखुचे सेवन न करण्या साठी शपथ देण्यात आली याप्रसंगी रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश राठोड , दंत रोग तज्ञ शितल मस्के , यांनी मार्गदर्शन केले 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर तिडके यांनी केले याप्रसंगी डॉ. मेन , डॉ. इंगोले , डॉ. बाठे डॉक्टर वानखडे , माने सिस्टर हीरोडकर , सिस्टर गाडेकर , सिस्टर मोनाली , सिस्टर वीर ,  सिस्टर सोनवणे , सिस्टर पारस्कर , शर्मा मॅडम , राहणे मॅडम व इतर कर्मचारी उपस्थित होते 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे