∆बार्शिटाकळीत आशाढी एकादशी निमित्त श्री गुरुदेव सेवा मंडळाचा तालुका मेळावा संपन्न.....∆कु.शुभ्रा शरद घोगरे व कु.परी मोहन राऊत या चिमुकल्यांनी साकारली होती विठ्ठल रुक्मिणी ची भुमिका....
∆बार्शिटाकळीत आशाढी एकादशी निमित्त श्री गुरुदेव सेवा मंडळाचा तालुका मेळावा संपन्न.....
∆कु.शुभ्रा शरद घोगरे व कु.परी मोहन राऊत या चिमुकल्यांनी साकारली होती विठ्ठल रुक्मिणी ची भुमिका....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम अंतर्गत, बार्शिटाकळी तालुका श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या तालुका महिला प्रमुख सौ पुष्पाताई रत्नपारखी यांचे नेतृत्वात, गुरुवार दिनांक २९ जून रोजी बार्शिटाकळी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सामुदायिक प्रार्थना मंदिर येथे दुपारी तीन वाजता, तालुका महिला कार्यकारिणी चा मेळावा उत्साहात संपन्न झाला. मेळाव्याला तालुका सेवाधिकारी श्री देविदास कावरे, प्रचार प्रमुख श्री धनंजय ढोरे, तालुका महिला सचिव सौ ज्योतीताई सरप, तालुका संघटक तथा बार्शिटाकळी नगर पंचायत च्या नगर सेविका सौ मनिषाताई बोबडे, कोमल लुंगे, पार्वती कावरे, रुक्मीणी चांदणे, सौ. रत्नप्रभा सरप, सौ सुनिताताई ठाकरे, रुपाली कोणप्ते, मिराताई बंड, सौ प्रमिलाताई काकड ,निलुताई सराटे, कु शिवाणी कावरे,त्याच बरोबर जिवन प्रचारक डॉ अशोक रत्नपारखी, ज्येष्ठ मार्गदर्शक कृषिभूषण मधुकरराव सरप, हरिदासजी रत्नपारखी, तुळशिरामजी बोबडे, हरिदास चांदणे, राजेश मोहोड, महादेवराव जानकर, तसेच बहुसंख्य महीलांची उपस्थिती होती. दुपारी तीन वाजता अधिष्ठान पुजन करून, महिला मंडळ भजनाचा कार्यक्रम झाला, त्या नंतर, हरिदासजी रत्नपारखी, तुळशिरामजी बोबडे, सौ मनिषाताई बोबडे,सौ ज्योतीताई सरप, यांनी उपस्थित महिलांना चातुर्मासाचे व सेवा मंडळाचे महत्त्व आपल्या प्रबोधनातून पटवून दिले. त्या नंतर स्थानिक संत गजानन नगर येथे नव्याने स्थापन झालेल्या श्री गुरुदेव सेवा महिला मंडळ शाखेच्या अध्यक्ष्या सौ सुनिताताई ठाकरे यांना मान्यवरांच्या हस्ते नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.या प्रसंगी तालुका सेवाधिकारी श्री देविदास कावरे, प्रचार प्रमुख श्री धनंजय ढोरे, तसेच मार्गदर्शकांच्या नियोजनात पुढील महिन्यात श्रावण मासानिमीत्त तालुकाभर महिला जनजागृती करुन जास्तीत जास्त गावात प्रत्यक्ष गाव बैठका घेऊन, महिलांना श्री गुरुदेव सेवा मंडळाचे तत्वज्ञानाचे महत्त्व पटवून, जास्तीत जास्त गावात अधिकृत महिला मंडळ शाखा स्थापन करणार असल्याचे ,सौ पुष्पाताई रत्नपारखी यांनी सांगितले. त्या नंतर सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली, भागवतकार सौ प्रमिलाताई काकड यांनी प्रार्थनेच्या महत्वावर चिंतन प्रकट केले. त्या नंतर आरती, जयघोष घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला. संचालन देविदास कावरे यांनी तर आभार प्रदर्शन सौ पुष्पाताई रत्नपारखी यांनी केले.अशी माहिती श्री गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका प्रसिद्धी प्रमुख श्री प्रदीप पाटील गावंडे यांनी दिली.
Comments
Post a Comment