चिंचोली रुद्रायणी येथे बँकेचा जनजागृती कार्यक्रम संपन्न......
चिंचोली रुद्रायणी येथे बँकेचा जनजागृती कार्यक्रम संपन्न......
बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी
भारतीय रिझर्व बँक ,बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या माध्यमातून क्रिसील फाऊंडेशन च्या सहकार्य नि मानिवाईझ वित्तीय साक्षररता केंद्र पातूर अंतर्गत ग्राम चिंचोली रुद्रायणी येथील नागरिकांना बँकेबद्दल जनजागृती करण्यासाठी कॅम्प आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गावातील लोकाना बचत आणि गुंतवणूक ,विमा ,पेन्शन कर्ज ,गो डिजिटल,प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व जीवन ज्योति विमा योजना आदि बँकिंग सेवा सुविधा विषयी माहिती देण्यात आली.तसेच शेतकऱ्यांना नाबार्ड माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष गावच्या प्रथम नागरिक सरपंच दुर्गाताई वर्गे होत्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून नाबार्ड चे DDM श्रीराम वाघमारे सर ,LDM नयन सिन्हा सर नितीन घोरे सर व पॉल सर होते.प्रमुख मार्गदर्शक व सल्लागार म्हणून श्रीराम वाघमारे व नयन सिन्हा सर यांनी गावातील नागरिकाना संबोधित केले. त्यामधील गावातील समस्या व त्यावर उपाय सुचविण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन पातूरचे मानिवाईझ वित्तीय साक्षररता केंद्र चे सेंटर मॅनेजर प्रशांत कुटे सर व पातूरच्या क्षेत्र समन्वयक संगीता अवचार मॅडम व बार्शीटाकळी चे क्षेत्र समन्वयक वैभव खंडारे सर व चिंचोली गावच्या बचत गटातील ग्रामसंघाच्या अध्यक्ष योगिता वर्गे मॅडम व ICRP रुखमिनी वर्गे मॅडम तसेच कार्यक्रमाला उपासतिथ उपसरपंच खंडारे मॅडम होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलण वैभव खंडारे सर यांनी केले व प्रास्ताविक संगीता अवचार मॅडम यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशांत कुटे सर यांनी केले.
Comments
Post a Comment