अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या अवैध वाहतुकीस थांबवा; मनसेचे तहसीलदारांना निवेदन....
अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या अवैध वाहतुकीस थांबवा; मनसेचे तहसीलदारांना निवेदन....
बार्शिटाकळी : बार्शिटाकळी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अवैध उत्खनन आणि त्यामुळे होणारी अवैध वाहतुकीस आळा घालावा अशी मागणी करणारे निवेदन बार्शिटाकळी तहसीलदार यांना देण्यात आले .
एरंड गावातील रहिवासी अक्षय सुरेश ढवळे यांचा नुकताच कातखेड विजारा दरम्यान अपघातात मृत्यू झाला त्या रस्त्याचे असलेली दुरावस्था व या दुरुस्तीस कारणीभूत असलेले परिसरातील खदानीतून होणाऱ्या अवैध उत्खनन आणि त्यासाठी होणारी अवैध वाहतुक जबाबदार असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला.
सदर रस्ता छोटा असुन मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये क्षमतेपेक्षा अधिक खनिज संपत्ती वाहतूक होत आहे अनेकदा विनापरवाना वाहनधारक हे वाहन चालवतात आणि अवैध वाहतूक असल्यामुळे भरधाव वेगाने जातात त्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे स्थानिक विझोरा, गोरवा , एरंडा, परंडा , कातखेड, राहीत साहित व अजनी येथील नागरिकांना अकोला येथे जाण्यासाठी हा एकच मार्ग असून या भरधाव अवैध वाहतूक नागरिकांच्या जीवितास धोका ठरत आहे प्रशासन याकडे कुठल्याही प्रकारचे लक्ष देत नाही सदर वाहनांमध्ये असलेले क्षमतेपेक्षा जास्त भरती किंवा वाहनांचा परवाना प्रशासन कधीही तपासात नाही रस्त्याची चाळण झाली असताना आणि रस्त्याचे काम सुरू असताना सुद्धा ही अवैध वाहतूक सुरू आहे ज्यामुळे रस्त्याचे काम व्यवस्थित होत नाही व अपघात होण्याची शक्यता वाढत आहे तरी प्रशासनाने या समस्येकडे लक्ष वेधून वाहतुकीस त्वरित निर्माण झाला व अन्यथा येणाऱ्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करेल असा इशारा मनसेचे तालुका प्रमुख सचिन गालट यांच्या सह आशिष खांबलकर, आदेश ढवळे, बाळकृष्ण ऊताने, सौरव फाले, मंगेश ढवळे, यांनी दिला आहे यावेळी मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते हजर होते
Comments
Post a Comment