मान्सूनपूर्व तयारीनिशी आसेगाव पोलीस विभागाची आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम....
मान्सूनपूर्व तयारीनिशी आसेगाव पोलीस विभागाची आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम....
बार्शिटाकळी तालुक्यांतील पिंजर अकोला येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे (जिवरक्षक) ToT प्रशिक्षक यांनी गिरवीले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे*
आसेगाव पोलीस ठाणे जिल्हा वाशिम यांनी मोतसावंगा धरणावर केले जोरदार आयोजन...
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
✍.. 23 जुन रोजी आसेगाव जिल्हा वाशिम येथील पोलीस ठाण्याचे वतीने वाशिम जिल्ह्यातील दुर्गमभागात असलेल्या मोतसावंगा धरणावर मान्सूनपूर्व तयारीनिशी पाण्याच्या निघटित आपात्कालीन घटनांमध्ये शोध व बचाव करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन आणी सुरक्षा या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन केले. याकरिता लाभलेले नामांकित प्रशिक्षक अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांनी मान्सून कालावधीत उद्भवणा-या आपात्कालीन घटनांमध्ये करावयाच्या कार्यवाही संबंधित अतिशय महत्त्वाचे मार्ग दर्शन करुन प्रात्यक्षिके दाखवुन नागरिकांना प्रशिक्षित केले.यावेळी दिपक सदाफळे यांचे सहकारी अतुल उमाळे यांनी सहकार्य केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आसेगाव पो.स्टे.चे एपिआय सागर दानडे साहेब,पिएसआय रविकिरण खंदारे साहेब,मोतसावंगा सरपंच,संपुर्ण पोलीस कर्मचारी तसेच मोतसावंगा येथील व धरण परीसरातील नागरिक उपस्थित होते मोतसावंगा चे सरंपच महादेव सातपुते यांनी आपल्या भाषणातुन सांगीतले की अशा प्रकारचे आमच्या करीता महत्त्वाचे असलेले प्रशिक्षण पहिल्यांदाच पाहायला व आयकायला मिळाले कारण मागच्या दोन वर्ष आधी याच धरणातून चारजण वाहुन जाऊन मरण पावले होते आता या प्रशिक्षणामुळे अशा घटनांना नक्कीच आळा बसेल असे मत व्यक्तकेले.एपिआय सागर दानडे साहेब यांनी आपल्या भाषणातुन उपस्थित नागरिकांना कायदा व सुव्यवस्था आणी मदत या विषयी मार्ग दर्शन केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पिएसआय रविकिरण खंदारे साहेब यांनी केले अशी माहिती पो.काॅ. कीसन मार्कंडे यांनी दीली आहे.
Comments
Post a Comment