स्वतः उपाशी राहून गोमातेची सेवा करणाऱ्या अवलिया रामराव चव्हाण यांना गायत्री परिवार ; "निर्भय बनो" च्या वतीने पाण्याच्या टाकीचे दान....! दानशूर लोकांनी मदतीचा हात द्यावा! समाजसेवक......!गजानन हरणे
स्वतः उपाशी राहून गोमातेची सेवा करणाऱ्या अवलिया रामराव चव्हाण यांना गायत्री परिवार ; "निर्भय बनो" च्या वतीने पाण्याच्या टाकीचे दान....! दानशूर लोकांनी मदतीचा हात द्यावा! समाजसेवक......! गजानन हरणे
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
.बार्शीटाकळी : तालुक्यातील काजळेश्वर दगडपाडवा येथील बंजारा समाजाचा गोसेवक स्वतः उपाशी तापाशी राहून गोमातेची सेवा निष्ठेने प्रेमाने व आपुलकीने गेली कित्येक वर्षापासून करीत आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील दुर्गाम अशा भागामध्ये श्रीसेवा गौशाळा काढून त्या गौरक्षण मध्ये शेकडो गाईंना ज्या गाईना कोणी वाली नाही ,कोणी वागवण्यास तयार नाही ,शेतकरी कशायला ज्या गाई विकतात किंवा मोकाट सोडून देतात. किंवा लोकांनी चारा नसल्यामुळे अनेक गाई त्यांना दिलेली आहे .अशा अनेक गाईची सेवा हा वेडा झालेला अवलिया कित्येक वर्षापासून करीत आहे .बंजारा समाजातील अत्यंत गरीबित जीवन जगत असलेले स्वतः कष्ट मजुरी करून आपला कुटुंबाचा व आपल्या गौशाळेमध्ये असलेल्या गाईंचा उदरनिर्वाह मोठ्या मेहनतीने व कष्टाने करीत असलेले हे रामराव चव्हाण गेल्या कित्येक वर्षापासून समाजसेवेने प्रेरित झालेले व्यक्तिमत्व असून अण्णा हजारे यांच्या चळवळीत सुरुवातीपासून काम केलेले तसेच सध्या काजळेश्वर येथे श्रीसेवा गौशाळा चालवत असलेले रामराव चव्हाण हे खऱ्या अर्थाने स्वतः उपाशी राहून या गाईंची सेवा मनोभावे करीत आहेत. या गोशाळेला कोणत्याही प्रकारे शासनाची मदत आजपर्यंत मिळाली नाही. तरीही अहो रात्रंदिवस या वेड्या झालेल्या माणसाच्या मनामध्ये गाई विषयी इतकी आपुलकी प्रेम आहे की स्वतःच्या कुटुंबाकडे, स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून या गाईंची सेवा कित्येक वर्षापासून स्वतः उपाशी राहून करीत आहेत. रात्रंदिवस या गाईंचा व गौरक्षणाचा ध्यास घेतलेले हे व्यक्तिमत्व नेहमी त्यासाठी धडपडत असते. प्रवास करीत असते लोकांकडे जाऊन चारापाणी व स्थानिक व्यवस्था करणे विषयी विनंती करीत असते कोणी मदत करो अथवा नको करो परंतु हा अवलिया या गाईसाठी जीव की प्राण देण्यास तयार असलेला आहे. स्वतःचं शेन काढणे, चारा टाकने ,पाणी पाजणे, साफसफाई करणे, जंगलात जाऊन गाईंना चारुन आणणे दिवसभर या गाईंच्या मागेपुढे पिसा झालेला हा अवलिया रामराव चव्हाण खऱ्या अर्थाने स्वतःच्या हिमतीवर व मेहनतीवर गौरक्षण चालवत आहे. शहरात किंवा इतर भागांमध्ये अनेक गौरक्षण असून त्या गौरक्षणाच्या भरोशावर पैसे कमावतात, प्रतिष्ठा मिळवतात देनगया मिळवतात परंतु दुर्गाम आदिवासी भागामध्ये राहून बंजारा समाजाचा हा हातमजुरी करणारा तरुण युवक व पत्नी सह संपूर्ण कुटुंब या श्रीसेवा गौशाळे साठी जीवन अर्पण करून दिलेली आहे .अशा या रामराव चव्हाण यांना व त्यांनी काढलेल्या गौशाळेला संस्थेला दानशूर लोकांनी दान देऊन त्यांच्या कार्याची कदर करून मदत देऊन त्याचा होसला बुलंद करण्यासाठी व त्याच्या कार्याला गती येण्यासाठी आपल्याला जेवढे शक्य असेल तेवढी मदत या अवलिया पर्यंत पोचवण्याची तसदी घ्यावी . मोठाल्या मोठा करण्यापेक्षा लहान रोपट्याला मोठे करून त्याच्या माध्यमातून या गायींची सेवा करण्याचे भाग्य तुम्हा आम्हा दानशूर लोकांना मिळू शकते आपल्याला जे शक्य आहे ते आर्थिक, वस्तूच्या चाऱ्याच्या स्वरूपात मदत करून वेडा पागल झालेल्या या अवलिया गौसेवकाला मोठ्या प्रमाणात मदत करून या गाई व ते गौरक्षण वाचवण्यासाठी आपण पुढे आले पाहिजे मदतीचा हात दिला पाहिजे अशा वेडा झालेल्या अवलिया माणसाला जपले पाहिजे . नुकतेच त्याच्या या गौरक्षणला भेट दिली त्याची काम करण्याची पद्धत व झोकून देऊन गाई साठी आपले आयुष्य अर्पण करणारा अशा पद्धतीचा गोऊ सेवक पूर्ण देशांमध्ये बघितला नाही .खरोखरच स्वतः व पत्नी कामाला जाऊन आलेल्या पैशातील मिळकत त्या गाईसाठी त्यांच्या सेवेसाठी अर्पण करणारा हा वेडापिसा झालेला गौसेवक पहालाकी की असे पद्धतचे अवलिया लोक या देशांमध्ये असून ते आपले काम प्रसिद्धीपासून दूर ठेवून मेहनतीने काम करीत असल्याचे दिसल्यामुळे त्याच्या श्रीसेवा गौशाळेला गायत्री परिवार व निर्भय बनो जनआंदोलन अकोल्याच्या वतीने पाण्याची टाकी, घमिले, ढेप देऊन त्याला मदतीचा हात दिला आहे .यावेळी त्या वस्तू देताना गायत्री परिवाराच्या वतीने मलकापूरचे माजी सरपंच मधुकरराव वाकोडे, निर्भय बनो जण आंदोलनाचे संयोजक तथा समाजसेवक गजानन हरणे, जिल्हाअध्यक्ष प्रमोद धर्माळे , उद्योजक बरीगेट बूम वस्तूचा स्वीकार करताना श्रीसेवा गौशाळेचे गौसेवक रामराव चव्हाण, सुभाष खंडारे यावेळी उपस्थित होते.आपले आपल्या परिवारातील वाढदिवस ,तेरवीवर होणारा खर्च टाळून , खर्च कमी करून या गोशाळेला जागृत नागरिकांनी दानशूर लोकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी , शासनाने या त्याच्या बाबीची दखल घेऊन काजळेश्वर येथील श्रीसेवा गौशाळेला मदत करावी अशी कळकळीची आग्रहाची नम्र विनंती समाज समाजसेवक गजानन हरणे व उपस्थित सर्व मान्यवरांनी केली आहे.तरी आपण या गौशाळेला भेट देऊन किंवा त्याच्या फोन नंबरवर..७०२०८६०३२४. यावर संपर्क करू त्याला हे गौरक्षण चालवण्या करीता, गाईंच्या कामाकरता त्याला प्रोत्साहन देऊन, मदत करावी अशी आग्रहाची आव्हान करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment