दगडपारवा येथील क्रीडा संकुलास मा. वसंतरावजी नाईक यांचे नाव देण्यात यावे वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी.....
दगडपारवा येथील क्रीडा संकुलास मा. वसंतरावजी नाईक यांचे नाव देण्यात यावे वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : बार्शिटाकळी पंचायत समिती यांच्या दिनांक २२-०७-२०२२ सर्वसाधारण सभे मध्ये दगडपारवा येथील क्रिडा संकुल इमारतीस हरित क्रांती चे प्रणेते स्व. वसंतरावजी नाईक साहेब यांचे नाव देण्यासाठी ठराव क्र. ०४ घेण्यात आला असून सदर ठरावा मध्ये दगडपारवा येथील तालुका क्रिडा संकुलास स्व. वसंतरावजी नाईक साहेब यांचे नाव देण्यात यावे जर दिनांक एक जुलै. 2023 पूर्वी तालुका क्रीडांगणाला वसंतरावजी नाईक साहेब यांचे नाव न दिल्यास वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल अन्यथा 1 जुलैला शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने स्वतःहून क्रीडांगणाला स्व. वसंतरावजी नाईक साहेब यांचे नाव देण्यात येईल याची शासनाने नोंद घ्यावी यासाठी बार्शिटाकळी चे तहसीलदार श्री दिपक बाजड साहेब यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल जामनिक, महासचिव अक्षय राठोड, दादाराव पवार प.स. सदस्य, गोर सेनेचे विदर्भ अध्यक्ष मनोहर राठोड , ऋषिकेश खंडारे, जिवन सावद, गणेश म्हैसने , सनी धुरंधर, निखील धाडसे, चेतन जामनिक, मंगेश धुरंधर, रोशन चोटमल, शिलवंत ढोले, सै. आदिल, निलेश इंगळे, गोपाल चव्हाण सरपंच, गणेश चौधरी, आकाश राऊत, आदी कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment