चोरीचा प्रयत्न करणार्या आरोपींना काही तासांतच केली अटक.....
चोरीचा प्रयत्न करणार्या आरोपींना काही तासांतच केली अटक.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : शहरातील जिल्हा परिषद मराठी कन्या शाळा ढोरे वेटाळ येथे दिनांक 28/6/2023 च्या रात्रीच्या वेळेस अंदाजे 1.32 च्या दरम्यान शाळे मधील डिजीटल रूमचा लोखंडी दरवाजा लोखंडी राॅडचा वापर करून तेडा करून शाळेतील रूमच्या अंदर शाळेतील साहित्य चोरी करन्याचा अज्ञात आरोपीने प्रयत्न करन्याची तक्रार शाळेच्या मुख्याध्यापीका कु नंदा मालवे यांनी पोलीस स्टेशन बार्शिटाकळी मध्ये तक्रार केल्यानंतर बार्शिटाकळी पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात आरोपी विरूद्ध अपराध नंबर 318/2023 कलम 361-461-511 भारतीय दंड संहिता अनूसार गुन्हा दाखल केला गेला व बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलीस निरिक्षक श्री संजय सोळंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शिटाकळी पोलीस पथकामध्ये पोलीस उप निरीक्षक निलेश तारक साहेब , हेड कांस्टेबल राजेश जौंधरकर , नायक पोलीस नागसेन वानखडे , पोलीस नायक पंकज पवार , पोलीस कांस्टेबल मनीष घुगे यांनी अथक परिश्रम घेऊन काही तासांमध्ये तांत्रिक तपास करून चोरीचा प्रयत्न करणारे आरोपी निखील साहेबराव कुकडे वय २० वर्षे रा भोईपुरा बार्शिटाकळी आणि सैय्यद वसीम सैय्यद नुर जामा मस्जिद चौक निवासी यांना पकडून बार्शिटाकळी चे कर्तव्य दक्ष पोलीस निरिक्षक श्री संजय सोळंके साहेब आणि त्यांचे सहकारी पोलीस पथकाने अथक परिश्रम केल्यानंतर आरोपीना काही तासांतच अटक करण्यात आल्याने बार्शिटाकळी पोलीस निरिक्षक संजय सोळंके साहेब आणि त्यांचे पोलीस पथकांची बार्शिटाकळी शहरातील नागरिक प्रशंसा करत आहेत
Comments
Post a Comment