बार्शिटाकली शहरात ईद-उल-अजहा शांततेत साजरी करण्यात आली.......

बार्शिटाकली शहरात ईद-उल-अजहा शांततेत साजरी करण्यात आली.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
गुरुवार, 29 जून रोजी सकाळी ठीक 8.15 वाजता ईदगाह येथे जामा मस्जिददीचे इमाम व खतीब मौलाना अजीज उल्लाह खान यांनी यावेळी ईदची नमाज अदा केली. संपूर्ण देशतील.परिस्थिती पाहता देशात शांतता राहावी आणि सर्वत्र शांतापूर्ण वातावरण राहावे व बंधुभावासाठी प्रार्थना करण्यात आली. 
ज्यामध्ये शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते, या वेळी शहरातील इतर मस्जिददींमध्ये सुध्दा ईदची नमाज अदा करण्यात आली. ज्यामध्ये मिनारा मस्जिद अकोली बेस येथे जमीयत-ए-उलामाचे तालुकाध्यक्ष मौलाना अब्दुल सलाम, मस्जिद ए अक्सा खडकपुरा येथे मौलाना एजाज, मस्जिद उमर फारूक बस स्टँड येथे हाफिज नुरुद्दीन, दहेंद बेस मस्जिद येथे सय्यद अब्दुल समद इमाम, खिडकीपुरा मस्जिद येथे हाफिज अन्वर यांनी तर गुलजारी मस्जिद बाजार लाईन येथे कारी अब्दुल हकीम यांनी ईदची नमाज अदा केली. ईदच्या नमाजानंतर शहरातील सर्व रस्त्यांवर सर्व हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकमेकांना मिठी मारून ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष हाजी महफुज खान, व उपाध्यक्ष हसन शाह, माजी सरपंच मासूम खान, मोहम्मद सादिक लीडर, ईदगाह कमिटीचे हाजी रफिक सेठ, शकील चौधरी, हाजी मोहम्मद सलीम महेक, हाजी सय्यद रफिक, मुफ्ती साद खान आदी उपस्थित होते. यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक संजय सोळंके साहेब, पोलीस उपनिरीक्षक नीलेश तारक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खूफिया पोलीस किशोर पिंजरकर, नागेसन वानखडे, राजेश जौंधरकर, पकंज पवार, मनीष धुगे, ईश्वर पातोंड, नामदेव भोरखडे, गोविंद सपकाळ आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे