दगडपारवा येथे गतिरोधक बसवण्याची गावकऱ्यांची मागणी.......
दगड पारवा येथे गतिरोधक बसवण्याची गावकऱ्यांची मागणी.......
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : आज दिनांक 23/6/2023 रोजी सन्माननीय तहसीलदार श्री दिपक बाजड साहेब यांना निवेदन देण्यात आले . या निवेदनामध्ये दगडपरवा येथे गतिरोधक बसवण्याची मागणी केलेली आहे महान ते बार्शिटाकळी मार्गे अकोला हा नवीन रोड बनवल्यापासून गतिरोधक बसवलेले नाही या कारणाने हा रोड गावाच्या मधोमध असल्याकारणाने लहान शाळकरी मुलं, मुली व वयोवृद्ध व्यक्ती हा रस्ता ओलांडावा लागतो तसेच लहान मुलांची शाळा रस्त्याला लागून असल्याकारणाने येथे अपघात (एक्सीडेंट) होण्याची दाट शक्यता आहे तसेच अकोला ते मंगरूळ जाणारा हा रस्ता समृद्धी या रस्त्याला मिळत असल्याने या रस्त्यावर बरीच वाहन वाहत असल्याकारणाने येथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे या कारणास्तव आम्ही काल गावातील सर्व मंडळींनी तहसीलदार श्री दिपक बाजड साहेबांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे नाहीतर आम्ही सर्व गावकरी मंडळी उपोषणाला बसण्याची तयारी आहे यावेळी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी डॉ गणेश महल्ले, श्री देविदास चव्हाण , मनोहर राठोड , पत्रकार निलेश इंगळे, जगदीश सरकटे , तसेच बाळू भाऊ राठोड सर्व मंडळी उपस्थित होते
Comments
Post a Comment