आरोग्य केंद्रात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न......

आरोग्य केंद्रात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न...
बार्शीटाकळी ( श्रावण भातखडे )
        जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन पर्यावरण समतोल ठेवण्याकरीता झाडे लावा झाडे जगवा हा उद्देशाप्रमाणे अकोला जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी  यांचा आदेशानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र कान्हेरी सरप येथे वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. सदर  कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी डॉ मंगेश गमे , यांच्या मार्गदर्शनाखाली दवाखाना परिसरात विविध प्रजातीचे १५ झाडांची लागवड करण्यात आली. सदर झाडांच्या संवर्धनासाठी लोखंडी जाळी तसेच त्यांना पाणी देण्याची जबाबदारी डॉ सचिन राठोड यांनी   घेतली . या वेळी डॉ मंगेश गमे यांनी पर्यावरणाचे  मानव जिवनात किती महत्व आहे त्या बद्दल माहिती दिली . त्या साठी प्रत्येक घरात एक व्यक्ती एक झाड लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे अशी शपथ उपस्थितांना देण्यात आली. सदर कार्यक्रमाध्ये श्री शेळके ,  रेखा ऊजाडे , विद्या तायडे ,शोभा नागे ,गणेश पारेकर ,गोविद कटरिया , आरोग्य सेवक राम बायस्कर ठाकूर , लिंक वर्कर बाळकृष्ण उताने , अलका जाधव आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे