मुख्य रस्त्याची तातडीने दुरुस्त करा... जि आई ओ युनिट चे मुख्याधिकारी यांना निवेदन......

मुख्य रस्त्याची तातडीने दुरुस्त करा.....जि आई ओ युनिट चे मुख्याधिकारी यांना निवेदन...... 
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी 27 जून 2023 जि आई ओ युनिट बार्शीटाकळीच्या वतीने मुख्याधिकारी नगरपंचायत बार्शिटाकळी यांना निवेदन देण्यात आले. सध्या मान्सूनचे आगमन झालेले आहे. शाळा महाविद्यालय सुध्दा सुरु झालेली आहेत. दरवर्षीचा अनुभव आहे की, बार्शिटाकळी शहरातील जिल्हा परिषदेच्या मराठी उर्दू माध्यमाच्या मुला मुलींच्या शाळा तसेच शहरात असलेले परफेक्ट इंग्लिश स्कुल, बाबासाहेब धाबेकर विद्यालय येथे सोमवार पेठ, दहँड वेस, काजी पुरा, मौला अली पुरा, अशोक नगर, काळा मारोती, हालोपुरा, मुजावर पुरा, गुलजार पुरा, वंजारी पुरा, खडकपुरा, इमलीबन परिसर इत्यादि वस्त्यांतून सर्वधर्मिय विद्यार्थी मुले-मुली शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात, विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्या जाण्याकरीता बार्शिटाकळी शहरातील एकमेव रोड मेन रोड हाच आहे.
मात्र सदर मेन रोडची अवस्था अत्यंत दयनीय झाली असल्याने पावसाळ्याच्या दिवसात सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होतो व विशेष करून
जामा मस्जिद चौक, करवाडिया स्वीट मार्ट,अमर मेडिकल, शाह मेडिकल इत्यादी ठिकाणी जास्त चिखल राहते.त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना येण्या जाण्याचा त्रास होतो.
दरवर्षीचा विद्यार्थ्याचा हा अनुभव असल्याने सदर मेन रोडची व्यवस्थित दुरुस्ती केल्यास विद्यार्थ्यांना शाळेत जाणा येणा करणे पावसाळ्याच्या दिवसात सोयीचे होईल व शैक्षणिक नुकसान होणार नाही.
 विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बार्शिटाकळी शहरातील मेन रोड ची दुरुस्ती लवकर करावी. अशी मागणी निवेदनात केलीलि आहे
निवेदन देताना सोबिया समीन, मिराज इरम, असना दानिश, जुनेरा असना, खंसा सदफ, खंसा खानम, जवेरिया अनम, शुमैला अनम,अनम फतेमा,अरीबा तकदीस,मदीहा अमरीन, तस्बीया इफरा,अशमीरा खानम,सबा परवीन,शिज़रा तलत,कुर्रातुऐन,मुस्कान तबस्सुम आधी उपस्थित होत्या

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे