बार्शिटाकळी तालुक्यात गरिबांच्या हक्काच्या राशन वर गदा आणणाऱ्या २५ अपात्र शिधापत्रिकाधारकांवर गुन्हा दाखल.....
बार्शिटाकळी तालुक्यात गरिबांच्या हक्काच्या राशन वर गदा आणणाऱ्या २५ अपात्र शिधापत्रिकाधारकांवर गुन्हा दाखल.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :अंत्योदय समुहाचा गैरफायदा घेणारे सरकारी व निम सरकारी नोकऱ्यांमध्ये गुंतलेल्यांसाठी आणि पेन्शनधारक आणि योजनेच्या लाभार्थ्यांसाठी क निश्चित करण्यात आलेल्या उत्पन्न पेक्षा जास्त उत्पन्न धारकांना गिव्ह इट अप मोहिमेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडून वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ओलांडलेल्या शिधापत्रिका धारकांनी योजनेचा लाभ सोडण्या चे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे बार्शीटाकळी तालुक्यात गिव्ह इट अप मोहीम राबवून जनजागृती करून शासकीय रेशनचा लाभ सोडण्याचे आवाहन करण्यात आले. यासोबतच मुनादीच्या माध्यमातून शहरातील लोकांपर्यंत माहितीही पोहोचवण्यात आली होती. 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत अपात्र शिधापत्रिकाधारकांनी गिव्ह इट अप मोहिमेअंतर्गत शासकीय शिधापत्रिका योजनेचा लाभ सोडावा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सूचित करण्यात आले होते. प्राप्त माहितीनुसार, शहर व तहसीलच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या 25 अपात्र राशन धारकांनी गिव्ह इट अप मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याने बार्शीटाकळीचे तहसीलदार दीपक बाजड यांनी जिल्हा अधिकारी निमा अरोरा मॅडम यांच्या आदेशानुसार स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस विभागाने सरकारी नोकऱ्या निवृत्ती वेतनधारक असूनही शासकीय रेशन योजनेचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या २५ आरोपींविरुद्ध भांदवी येथे कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या 25 आरोपींमध्ये चिंचोली गावातील 4, खेर्डा बुजुर्ग 2, टिटवा 1, मिर्झापूर 1, सारकिन्ही 2, रेडवा 4, राजंडा 2, सिंदखेड 4, महान 2, आणि ढाबा गावातील 3 यांचा समावेश आहे, पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नीलेश तारक पुढील तपास करत आहेत.
..................
राष्ट्रीय अन्य धान्य योजनेच्या प्राधान्य गट व अंत्योदय गट चा लाभ घेणाऱ्या सरकारी,निमसरकारी कर्मचारी व पेंशन धारक तसेच वार्षिक उत्पन्न ची सीमा पार करणारे कार्ड धारकांनी अजून हि स्वतः तहसील कार्यालयात येऊन गिव इट अप करून राशन चा लाभ घेणे टाळावे असे आवाहन तहसिलदार दीपक बाजड यांच्या मार्गदर्शनखाली पुरवठा निरीक्षक आनंद गुप्ता यांनी केले आहे.
Comments
Post a Comment