बार्शीटाकळी मध्ये नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम संपन्न....
बार्शीटाकळी मध्ये नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम संपन्न....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
आज बार्शीटाकळी शहरा मध्ये वंचित बहुजन आघाडी तर्फे नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम वंचित बहुजन आघाडी चे अकोला जिल्हा अध्यक्ष आद.प्रमोदभाऊ देंडवे, महासचिव आद. मिलिंद भाऊ इंगळे तसेच जेष्ठ नेते नईमोददीन भाई यांचे मार्गदर्शन खाली नगर पंचायत बार्शीटाकळी गटनेते सुनिल विठ्ठलराव शिरसाठ यांनी प्रभाग क्रमांक १ मध्ये आज दि. २५/६ /२०२३ रोजी आयोजन केले होते,
सदर कार्यक्रमाला बार्शीटाकळी शहर चे जेष्ठ नेते नईमोददीन भाई, तालुका कार्याध्यक्ष गोरसिंग राठोड, युवा तालुका अध्यक्ष अमोल जामणीक, नगरसेवक सुरेश जामनिक, नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, शहर अध्यक्ष अझहर पठाण, अनिल धुरंधर, दादाराव जामनिक, हरीश रामचवरे, श्रीकृष्ण देवकुणबी, शुद्धधोन ईंगळे, शुभम ईंगळे, ईमरान खान, शोएब खान, इब्राहिम खान, जावेद शेख, राजकुमार खाडे, अमित तायडे,मिना ताई जंजाळ (बि एल वो.), सिताराम बलखंडे, देवेंद्र खाडे, धम्मपाल जामनिक, मनिष वाहुळे, बाळु जामनिक, भारत मोरे, शैलेष शिरसाठ, निपुल ठोले, अमोल खाडे, अमिर खान, रुषीकेष अरखराव, हर्षल मोहोड, आर्यन खाडे, शेखर शिरसाठ , राहुल बलखंडे, व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात दुपारी एक वाजे पर्यंत २७० नवीन मतदार यांनी त्यांचे कागदपत्रे जमा केली होती.
आमचे नाव मतदार यादीत येणार व मतदान करणार याबाबत नवीन मतदार यांनी आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाचे संचालन गटनेते सुनिल विठ्ठलराव शिरसाठ यांनी केले तर आभार प्रदर्शन शहर अध्यक्ष अजहर पठाण यांनी केले
Comments
Post a Comment