बार्शिटाकळी पोलीसांची दबंग कारवाई दोन दिवसातच आरोपीना अटक करुन दोन गुन्हे केले उघड.....
बार्शिटाकळी पोलीसांची दबंग कारवाई दोन दिवसातच आरोपीना अटक करुन दोन गुन्हे केले उघड.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : येथील कसाब पुरा परिसर निवासी नज़ाकत उल्ला खान किफायत उल्ला खान यांचे मालकीची वाहन मैक्स पिकअप क्रमांक MH-34 -M-4402 किंमत अंदाजे दोन लाख रुपये त्यांचे राहते घरा पासुन रात्रिचा फ़ायदा घेवुन अज्ञात आरोपींनी चोरून नेल्याची तक्रार पोलीस स्टेशन बार्शिटाकळी मध्ये फिर्यादी नज़ाकत उल्ला खान किफायत उल्ला खान यांनी दिली होती पोलीस निरिक्षक श्री संजय सोळंके साहेब आणी त्यांचे पथकांनी कोणताही विलंब न करता तपासाची चक्रे फिरवून आरोपी नामे सोहेल खान मगफंर खान काजीपुरा बार्शिटाकळी निवासी आणी एक विधी संघर्ष ग्रस्त बालक असे दोन आरोपींना अमरावती जिल्ह्याच्या दर्यापुर येथून वाहनांसह ताब्यात घेण्यात आले व बार्शिटाकळी पोलीस स्टेशन मध्ये गून्हा दाखल करण्यात आला आरोपींना अटक करण्यात आली दोघांना न्यालयात हजर केले असता एक आरोपी विधी संघर्ष ग्रस्त असलयाने न्यायालय ने त्याची सुटका केले आणी दूसरा आरोपी मुख्य सुत्रधार सोहेल खान मगफेर खान याची अकोला जिला मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली ही कारवाई कर्तव्य दक्ष पोलीस निरिक्षक श्री संजय सोळंके साहेब यांचे मार्गदर्शनाखाली हेड कांस्टेबल राजेश जौंधरकर, नायक पोलीस नागसेन वानखडे, पोलीस नायक पंकज पवार, पोलीस कांस्टेबल मनीष घुगे आणी पोलीस कांस्टेबल ईश्वर पातोंड यांनी अथक परिश्रम घेवुन वाहन चोरीचा सूगावा लावुन आरोपींना विना विलंब वाहना सह अटक केली असे करुन बार्शिटाकळी पोलीसांनी दोन दिवसात आव्हान स्वीकारून दोन्ही चो-या उघड करुन दोन्ही चोरी मधील मूद्देमाला सह आरोपींना अटक केल्याने बार्शिटाकळी पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे
Comments
Post a Comment