कानडी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची छापा...... दाहा जणांना अटक;पाच हजार दोनशे विस रुपये जप्त...

कानडी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची  छापा.....
दाहा जणांना अटक;पाच हजार दोनशे विस रुपये जप्त....


 बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी तालुक्यांतील ग्राम पिंजर पोलिस स्टेशन हद्दीतील कानडी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून १० आरोपींना मुद्देमालासह अटक केली, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कानडी येथे बावन पत्याचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी कानडी गाठून जुगार अड्ड्यावर छापा टाकला जुगार खेळत असताना आरोपी नितेश पवार वय (३५) अमोल पवार वय (३३) एकदास जाधव वय(३५) आशिष पवार वय (३७) रामेश्वर जाधव वय (६५) शंकर अवचार वय(६५) दादाराव खाडे वय(६०) अनिल राठोड वय (३५) गिरधारी जाधव वय (४५) संजय राठोड वय(४०) ज्ञानेश्वर जाधव वय (३५) हे राहणार कानडी यांच्याविरुद्ध जुगार प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला, आरोपी कडून पाच हजार दोनशे विस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई ठाणेदार अजय कुमार वाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बंन्डू मेश्राम सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजु वानखडे,नामदेव मोरे, अभिजित सिरसाठ,भुषण माकमुले श्रीकांत आजलसांडे,व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली,,,,

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....