आगामी आषाढी एकादशीच्या तसेच बकरी ईदच्या निमीत्त बार्शिटाकळी पोलीसांचे शहरात पथसंचलन.....
आगामी आषाढी एकादशीच्या तसेच बकरी ईदच्या निमीत्त बार्शिटाकळी पोलीसांचे शहरात पथसंचलन.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
आगामी आषाढी एकादशी , तसेच बकरी ईद निमीत्त बार्शिटाकळी शहरात शांतता रहावी यासाठी व कुठल्याही प्रकारे शहरात शांतता भंग होणार नाही यासाठी बार्शिटाकळी पोलिसांनी शहरात पथसंचलन केले यावेळी बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संजय सोळंके, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश तारक यांनी व त्यांच्या सोबत पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांना सोबत घेऊन पोलीस स्टेशन मधुन अकोली वेस मज्जीद मार्गे ढोरे वेटाळ, खिडकी पुरा मज्जीद, काळा मारोती, जामा मज्जीद चौक, बाजार लाईन, खडकपुरा चौक, नगरपंचायत चौक मार्गे पोलीस स्टेशन पर्यंत पथसंचलन केले असे खुपिया विभागाचे प्रमुख श्री कीशोर पिंजरकर यांनी कळविले
Comments
Post a Comment