मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशाने विवेक सोनूने धर्मदाय उपआयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अकोला यांची चौकशी सुरु बदलीचा अर्ज नामंजुर....
मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशाने विवेक सोनूने धर्मदाय उपआयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अकोला यांची चौकशी सुरु बदलीचा अर्ज नामंजुर....
बार्शिटाकळी येथील समाज सेवक तथा व्हिस्टल ब्लोअर अब्दुल समद शेख यांनी अकोला येथील धर्मदाय उपआयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अकोला यांचे विरूद्ध मुंबई उच्च न्यायालय आणी धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कड़े तक्रार केली होती त्या तक्रारीचे अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयचे न्यायधीश यांनी धर्मदाय आयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांना चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या आधारे सदर चौकशी अमरावती विभागाचे सह आयुक्त तथा न्यायधीश यांचे कड़े चौकशी देण्यात आली होती परंतु अमरावतीचे सहआयुक्त तथा न्यायधीश यांनी बार्शिटाकळी येथील समाज सेवक अब्दुल समद शेख यांचे अमरावती येथे बयाण घेतले होते व अकोला येथील धर्मदाय उपआयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय मध्य येवुन चौकशी केली होती परंतु चौकशी व कारवाई चे भीतीने धर्मदाय उप आयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अकोला यांनी आपली बदली व्हावी महणुन महाराष्ट्र राज्य मुंबई येथे धर्मदाय आयुक्त यांचे कड़े बदलीचा अर्ज दिला होता धर्मदाय आयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी धर्मदाय उपआयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अकोला यांचे बदलीचा अर्ज रद्द केला व मुंबई उच्च न्यायालय यांचे आदेशाने चौकशी व कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे अकोला सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालया मधील गैर प्रकार व मनमानी कारभार भ्रष्टाचार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे हे विशेष.
Comments
Post a Comment