दोन वाहनांच्या धडकेत तीन जण जखमी...पिंजर ते बार्शिटाकळी रोडवरील जयस्वाल पेट्रोल पंप जवळील घटना....
दोन वाहनांच्या धडकेत तीन जण जखमी....
पिंजर ते बार्शिटाकळी रोडवरील जयस्वाल पेट्रोल पंप जवळील घटना...
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी तालुक्यातील पिंजर पोस्ट.स्टे हद्दीत 17 जुन रोजीची सायंकाळी अंदाजे 6:30 ते 7:00 वाजताचे दरम्यान ची घटना
*पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाची तत्परता अवघ्या दहा मिनिटात रुग्णवाहीकासह जवान घटनास्थळी दाखल*
-- 17 जुन रोजी सायंकाळी अंदाजे 6:30 वाजता पिंजर येथील जयस्वाल पेट्रोल पंप चे मालक पवनकुमार जयस्वाल यांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांना फोनवर दोन वाहनाची धडक होऊन अपघात झाल्याची माहीती दीली लगेचच दिपक सदाफळे यांनी आपले सहकारी मयुर सळेदार,अंकुश सदाफळे,सुरज ठाकुर, महेश वानखडे,अमित ठाकुर,ज्ञानेश्वर वेरुळकार यांना घटनास्थळी रवाना केले शणीवार असल्याचे लक्षात येताच तो पर्यंत दिपक सदाफळे यांनी पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन डाॅक्टरांना माहीती देऊन बोलून घेतले लगेच पंधरा मिनिटात अपघातातील तीनही जखमींना उपचारासाठी दाखल केले. अपघातातील जखमी सय्यद नुर वय अंदाजे (24) वर्ष, अब्दुल उममार वय अंदाजे (25) वर्ष दोघेही राहणार अकोट फैल अकोला दुसरे जखमी गणेश रामभाऊ लहामगे वय अंदाजे (20) वर्ष मयुर मधुकर मेसरे वय अंदाजे (31) वर्ष दोघेही राहणार पिंजर जिल्हा अकोला यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या रुग्णवाहीकेने अंकुश सदाफळे यांनी दाखल केले आता अपघातातील तीन जखमी सुखरुप असुन घरी परतले आहे यापैकी अकोट फैल अकोला यांना खांद्या जवळ किरकोळ फ्रॅक्चर असल्याने ते उपचार घेत आहेत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नसुन अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अशी माहिती पथक प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांनी दीली आहे.
Comments
Post a Comment