पर्यावरण सप्ताहानिमित्ताने बार्शिटाकळी येथील विद्रुपा नदी सफाई करणे बाबत मुख्याधीकारी यांना निवेदन....

पर्यावरण सप्ताहानिमित्ताने बार्शिटाकळी येथील विद्रुपा नदी सफाई करणे बाबत मुख्याधीकारी यांना निवेदन....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शीटाकळी : ६ जून जमाते इस्लामी हिंद शाखा बार्शिटाकळी विद्रुपा नदी काठाजवळील शेतकरी,नागरीकांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपंचायत बार्शिटाकळी यांना निवेदन सादर करण्यात आला, बार्शिटाकळी शहरातून विद्रुपा नदी वाहते, मात्र सदर नदीवर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घाण साचलेली आहे ज्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नदीचे पाणी अवरुध्द होऊन ते वार्शिटाकळी शहरातील नदी काठी असलेल्या दहेंडबेस, काजीपुरा, माळी पुरा, मुजावर पुरा, अशोक नगर तथा हालोपुरा मध्ये शिरून त्यामुळे मोठ्या प्रमाणात साथीचे रोग व इतरही प्रकारची हानी होण्याची दाट शक्यता आहे किंबहुना दरवर्षी ह्या अडचणींचा सामना या भागातील नागरीकांना करावा लागतो.
तसेच सदर नदीच्या काठावर असलेल्या शेतामध्ये सुध्दा नदीचे फुटलेले पाणी शिरुन पिकाची दरवर्षीच नासाडी होते. तसेच विद्रुपा नदीकाठावर दोन स्मशान भूमी आहेत. नदीचे साचलेले पाणी बरेच दिवस साचून राहत असल्याने म्हणजे ते नदीमधील घाण कचरा व फोफावलेल्या विविध वनस्पतींमुळे वाहते राहत नसल्यामुळे स्मशानभूमीचा तसेच या भागातील शेतकऱ्यांचा शेतामध्ये जाणे येणे करण्याचा रस्तासुध्दा बंद होतो.
ही स्थिती बदलण्यासाठी पावसाळ्यापूर्वी सदर विद्रुपा नदीमध्ये विविध ठिकाणी साचलेला घाण कचरा व नदीमध्ये फोफावलेली विविध प्रकारची अनावश्यक वनस्पती काढून नदी स्वच्छ करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली.

सैयद अब्दुल समद, अजीज खान, मुदस्सिर अली खान, रईसोदि्दन शेख, साजिद खान, सलमान खान, नसरुल्लाह खान,फैजान खान, आतिफ खान, मोहम्मद साईम इत्यादी निवेदन देताना हजर होते 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे