नुकतेच निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार वेतन निश्चित करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्याची शिक्षेकेत्तर कर्मचारी संघटनेची मागणी.....

नुकतेच निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार वेतन निश्चित करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्याची शिक्षेकेत्तर कर्मचारी संघटनेची मागणी.....

बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
 नुकतेच महासंघाचे सरचिटणीस मा.डॉ.आर. बी. सिंग साहेब यांच्या आदेशान्वये पुणे येथे उच्च शिक्षण संचालक मा. शैलेंद्र देवळणकर साहेब यांच्या सोबत विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मिटिंग आयोजित करण्यात आली होती. प्रथम महासंघाच्या वतीने मा. देवळणकर साहेब यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर दि 31 मे 2023 रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार वेतन निश्चिती करण्या करीता शिबाराचे आयोजन करावे अशी मागणी करण्यात आली यावर साहेबानी सांगितले की पुढील दोन दिवसात सर्व विभागीय सहसंचालकांची मीटिंग अयोजित करून त्यांना वेतन निश्चिती शिबीर बाबत सूचना देऊन लवकरात लवकर वेतन निश्चितीचे काम पूर्ण करण्यास सांगतो असे सांगितले. तसेच सरळ सेवेने प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक व ग्रंथालय सहाय्यक यांची पद भरतीची फाईल वित्त विभागात मंजुरीसाठी आहे मंजुरी मिळाल्यावर त्वरित भरती प्रक्रिया सुरू होईल असे अश्वस्थ केले, तसेच शिपाई पदाच्या 4400-7400 वेतनश्रेणीवर चर्चा करण्यात आली, प्रयोगशाळा सहाय्यकांची 4000- 6000 वेतनश्रेणीवर म्हणाले की संबंधित फाईल मंजुरीसाठी पाठविली आहे. अश्या अजून विषयांवर सकारात्मक चर्चा झाली असून या प्रसंगी सहसंचालक श्री बच्छाव साहेब यांचा देखील सत्कार करण्यात आला. या मीटिंग साठी महासंघाचे अध्यक्ष श्री राजा साहेब बढे अकोला, कार्याध्यक्ष श्री, शशिकांत कामटे, उपाध्यक्ष श्री चंद्रकांत धनावडे, मुंबई विभागाचे, श्री दिलीप मोरे, श्री दिलीप पवार, श्री अनिल लबरे, श्री अरुण पाटील,जळगाव विभागीय सरचिटणीस डॉ ऋषिकेश चित्तम, व नागपूर ,मुंबई व पुणे विभागातून मोठया संख्येने पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.अशी माहिती राजा साहेब बढे अकोला यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे