वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर......

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर......

तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शीटाकळी :  येथे हरित क्रांतीचे प्रणेते, कृषी जनक व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 110 व्या जयंतीनिमित्त संदेशभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गोरसिकवाडी - गोरसेनेच्या वतीने अकोल्यातील बार्शीटाकळी येथे भव्य शोभा यात्रा आणि मोटारसायकल रॅली काढण्यात आली व दगडपारवा येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी रैलीमध्ये मोठ्याप्रमाणात, संदेश भाऊ तुम आगे बढो हम तुमारे साथ है घोषणाबाजी करण्यात आली. प्रा संदेश भाऊ चव्हाण गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष भारत यांच्या नेतृत्वाखाली ह्या रॅलीला रक्तदान शिबीर बार्शीटाकळी येथून सुरवात होऊन दगडपारवा येथे समारोप करण्यात आला. समारोपनंतर रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यावेळेस दगडपारवा येथील नायक कारभारी, हसाबी नसाबी, सरपंच सदस्य पोलीस पाटील, तंन्टामुक्त अध्यक्ष व कातखेड येथील धरमळी याडी नायकण, तसेच निता जाधव जुने शहर धरमळी याडी उपस्थित तसेच गोर सेना पदाधिकारी मित्र मंडळ यांनी 40 बॉटल रक्तदान केले. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रॉलीमध्ये वंचित बहुजन आघाडीनेही आपला सहभाग नोंदवला होता. यावेळी गोर सिकवाडी, जिल्हा सहसंयोजक रविंद्र जाधव, बार्शिटाकळी तालुका संयोजक विकास जाधव, गोर सेना विदर्भ अध्यक्ष मनोहर राठोड, जिल्हा सचिव शालिग्राम राठोड, व जिल्हा पदाधिकारी तसेच गोर सेनेचे तालुका उपाध्यक्ष अतिश राठोड, शहर अध्यक्ष राहुल राठोड, कोषाध्यक्ष कुलदीप चव्हाण, सहसंघटक अविनाश राठोड, सहसचिव शिवराज जाधव, कृष्णा, कौसल जाधव , तालुका पदाधिकारी सर्कल अध्यक्ष, शाखा अध्यक्ष उपस्थित होते, व वंचित बहुजन युवा आघाडीकडून राज्य महासचिव राजेंद्र पतोंड, सचिन शिराळे, प . स.सदस्य दादाराव पवार उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे