गुलाम नबी आझाद महाविद्यालय येथे प्राचार्य डॉ मधुकर पवार यांचा सेवापुर्ती सत्कार समारंभाचे आयोजन....!

गुलाम नबी आझाद महाविद्यालय येथे प्राचार्य डॉ मधुकर पवार यांचा सेवापुर्ती सत्कार समारंभाचे आयोजन.....!

बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :  प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना द्वारा संचालित गुलाम नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शीटाकळी येथे तीन जुलै ला नगराध्यक्ष महेफूज खान यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली सेवापूर्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्या चे आयोजिले आहे एकूणच 28 वर्ष प्राचार्य पदावर असलेले आणि एकूण शिक्षकी पेशात 43 वर्ष सतत सेवा देणारे महाराष्ट्रातील एकमेव प्राचार्य म्हणून ज्यांची ख्याती आहे असे डॉ मधुकरराव पवार यांना तसेच उपप्राचार्य म्हणून सतत सेवा देणारे डॉ आर आर राठोड, महाविद्याल्यात अतिशय यशस्वी लेखापाल म्हणून ज्यांनी काम सांभाळलं असे श्री सतीश कापसे ग्रंथालय परिचर म्हणून अतिशय उत्तमरीत्या काम करणारे श्री मुफीज खान यांना सेवापुर्ती सत्कार तसेच नवनियुक्त प्रभारी प्राचार्य प्रा डॉ तारेश पी आगाशे यांचा सत्कार डॉ आर डी सिकची तसेच डॉ विजय नागरे सदस्य व्यवस्थापन परिषद अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या हस्ते केल्या जाईल तर सदर कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीत माजी उप प्राचार्य नरसिंह राठोड कळमेश्वर जी.नागपूर व हरिष चंद्र पवार संस्थापक सदस्य प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ हे राहणार आहे. तेव्हा या सत्कार समारंभ सोहळ्याला बार्शीटाकळी परिसरातील अनेकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.असे उप प्राचार्य डॉ बी एस खान यांनी कळविले आहे. 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे