बार्शिटाकळी येथे अतिवृष्‍टीमुळे झालेल्‍या नुकसानीची मा.आमदर हरिषभाऊ पिंपळे यांनी केली पाहणी.....

बार्शिटाकळी येथे अतिवृष्‍टीमुळे झालेल्‍या नुकसानीची मा.आमदर हरिषभाऊ पिंपळे यांनी केली पाहणी.....
◆अधिवेशानत नुकसानीची मांडली व्‍यथा तसेच मदतीची केली मागणी.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : मुर्तिजापूर मतदारसंघामध्‍ये मुसळधार पावसामुळे खुप मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून त्‍यामध्‍ये शेती पीकाचे नुकसान तसेच नागरीकांची घरांमध्‍ये पाणी घुसून घरांचे व साहीत्‍याचे सुध्दा नुकसान झालेले आहे. सदर मुद्दा मा. आमदार हरीषभाऊ मारोतीआप्‍पा पिंपळे यांनी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला असून त्‍यावर योग्‍य ती मदत देण्‍याचे मा. उपमुख्‍यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आश्‍वासन दिले आहे. सदर नुकसानग्रस्‍त भागाची पाहणी मध्‍ये बार्शिटाकळी तालुक्यातील  घोटा, पाराभवानी, मोरळ, कासारखेड, पिंपळगाव चांभारे, धाकली, पिंपळगाव हांडे, सावरखेड, निहिदा, लखमापूर, टिटवा, मारखेड, मोझर, पिंजर, खेर्डा खुर्द, खेरडा भागाई, मोझरी, पारडी, निंबी, सोनखास, पातुर नंदापूर या गावांमध्‍ये पाहणी करण्‍यात आली. तसेच प्रशासनास पंचनामे करण्‍याचे निर्देश देण्‍यात आले असून लवकरच नुकसानग्रस्‍तांना मदत मिळेल असे आश्‍वासन दिले.  
सदर पाहणी वेळी मा.आमदार हरीषभाऊ मा. पिंपळे, उपविभागीय अधिकारी श्री संदीपकुमार अपार, तहसीलदार श्री दिलीप बाजड, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसचिव तसेचयोगेश कोंदनकार, संजय चौधरी उपसभापती, रामसिंग राठोड जि प सदस्य, रमेश आप्पा खोबरे, गणेश झलके, राधेश्याम खरतडे, संजय इंगळे, अविनाश महले, गणेश महले, सुनील ठाकरे, गजानन लुले, गजानन आप्पा मळगे, सुधाकर महल्ले, अशोक राठोड, गोवर्धन सोनटक्के, गोपाल महल्ले, वैभव पाठे,  राम आंबेकर, प्रवीण धाईत, विजय ठाकरे, संदीप राठोड व संबंधित विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे