भाविकांच्या वतीने मनसेचे निवेदन......
भाविकांच्या वतीने मनसेचे निवेदन......
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : सध्या हिंदू धर्मीयांचा श्रावण महिना तसेच हिंदू धर्मामध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या अधिक महिना हा सुरू झालेला असून यावेळी सदर महिन्यात मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असते. यावेळी श्री राम मंदिर व श्री खोलेश्वर या मंदिरांमध्ये देखील भावीक भक्त मोठ्या प्रमाणात येत असतात. यामध्ये महिला भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता तसेच स्थानिक नगरपंचायत निवडणुकीचे वातावरण बघता गावामध्ये सामाजिक वातावरण बिघडवण्याची शक्यता नाकारता येत नाही , त्यामुळे श्री खोलेश्वर मंदिर तसेच श्रीराम मंदिर येथे पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी यावेळी भाविकांच्या वतीने मनसेचे वतीने निवेदन द्वारे करण्यात आली.
सदर निवेदन हे संपर्कप्रमुख विठ्ठल लोखंडकार व जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष सचिन गालट यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष वैभव उर्फ राज पाटील कोहर यांच्या वतीने देण्यात आले . निवेदन देतेवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला तालुकाध्यक्ष कल्पनाताई राठोड, बाळकृष्ण उताणे , सचिन गोपनारायण , गजानन काळे, शुभम राजूरकर ,संदीप आखाडे, राम चव्हाण ,भूषण गावंडे ,भाऊराव पाटील ,अनंता आकोतकर , दीपक काळसाईत ,सुरेश चव्हाण ,शुभम बोले , सागर खरारे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment