कातखेड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी गोरसिंग राठोड तर उपसरपंच प्रतिभा विजय खंडारे विजयी....
कातखेड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी गोरसिंग राठोड तर उपसरपंच प्रतिभा विजय खंडारे विजयी....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : कातखेड ता. बार्शिटाकळी येथील सरपंचपदाची निवडणूक शुक्रवारी शांततेत पार पडली अत्यंत चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या कातखेडच्या सरपंच पदी वंचित बहुजन आघाडीचे बार्शीटाकडी तालुका कार्याध्यक्ष गोरसिंग राठोड दणदणीत विजयी झाले . सदैव जनतेच्या कामासाठी तत्पर असणारे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी विराजमान झाल्यावर गावात अत्यंत आनंदाचे वातावरण निर्माण झाले .
बार्शिटाकळी चे तहसीलदार डाबेराव यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली असून या निवडणुकीला प्रमुख पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिरीष खंडारे, ग्रामपंचायतचे तलाठी गव्हाळे, कातखेडचे ग्रामसचिव गोविंद चव्हाण आधी प्रमुख पाहुण्यांचे उपस्थितीत पार पडली सरपंच पदी गोरसिंग राठोड तर उपसरपंच पदी प्रतिभा विजय खंडारे विजयी झाल्या .
यावेळी ग्रामपंचायत सदस्य पवन जाधव , नितेश रमेश खंडारे, शितल सिताराम पवार यांचे योगदान लाभले तर गावातील मोलाचे सहकार्य करणारे विष्णू राठोड मनसिंग राठोड , गोवर्धन राठोड , जानराव खरात , दिगंबर चक्रनारायण , भास्कर वानखडे , बाबाराव राठोड , रामेश्वर राठोड , ज्योतीराम जाधव , पोलीस पाटील यांनी अथक परिश्रम घेऊन गावातील ग्रामपंचायत निवडणूक पार पडली
Comments
Post a Comment