∆वसंतरावजी नाईक ह्यांच नाव देण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीची दगडपारवा तालुका क्रीडा संकुलावर धडक ...... ∆जिल्हा क्रीडा प्रशासनास दीला १५ दिवसांचा अल्टिमेटम......
∆वसंतरावजी नाईक ह्यांच नाव देण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीची दगडपारवा तालुका क्रीडा संकुलावर धडक ......
∆जिल्हा क्रीडा प्रशासनास दीला १५ दिवसांचा अल्टिमेटम......
बार्शिटाकळी (अकोला) दि. ०१-
दगडपारवा तालुका क्रीडा संकुलावर वसंतरावजी नाईक ह्यांच्या नाव देण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीने आज आक्रमक होत बार्शी टाकळी येथील दगडपारवा येथे
धडक दिली.मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते, युवा आघाडीने थेट वसंतराव नाईक क्रीडा संकुलाचे नावांचा फलक ठाणेदार सोळंके ह्यांना सोपवुन पंधरा दिवसांत लावण्याचा अल्टिमेटम
जिल्हा क्रीडा प्रशासनास दिला ह्यावेळी मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच बंजारा समाजातील महीला पुरूष कार्यकर्ते उपस्थित होते.
बार्शिटाकळी तालुक्यातील दगडपारवा येथील तालुका क्रीडा संकुलास माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतरावजी नाईक यांचे नाव देण्याची मागणी वंचित बहुजन युवा आघाडी ने २७ जुन ला जिल्हा क्रीडा अधिकारी यांना निवेदन देत केली होती.अन्यथा १ जुलै रोजी वसंतराव नाईक यांचे जयंती निमित्त नामकरण करण्याचा इशारा युवा आघाडीने दिला होता.तसेच हे नांव देण्याचा ठराव बार्शी टाकळी पंचायत समितीचे वतीने वर्षभरापूर्वी पारीत करून तालुका क्रीडा संकुल समितीकडे पाठविण्यात आला होता.मात्र वर्षभर त्यावर निर्णय घेण्यात आला नव्हता.ऊलट आज मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्याची मागणी जिल्हा क्रीडा अधिकारी सतिश भट ह्यांनी केली होती.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कडून आलेल्या मागणी नुसार बार्शी टाकळी व पिंजर पोलीस स्टेशनचे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आज युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे यांच्या नेतृत्वात बार्शी टाकळी येथे वसंतराव नाईक ह्यांच्या प्रतिमेचे पूजन करून बाईक रॅली काढून
दगडपारवा येथील तालुका क्रीडा संकुलास धडक दिली. स्व. वसंतरावजी नाईक नामफलक एक तर प्रशासनाने लावावा अन्यथा आम्ही लावू असा पवित्रा राजेंद्र पातोडे ह्यांनी घेतला.त्यावर बार्शिटाकळी पोलिस स्टेशन चे ठाणेदार यांच्या कडे नामफलक देवुन क्रीडा अधिकारी ह्यांच्या कडे सोपविण्याची मागणी आंदोलकांनी केली.नामफलक न लावल्यास पंधरा दिवसात पुन्हा धडक देण्याचा इशारा दिला गेला.
यावेळी गोर सेना व वंचित युवा आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी ने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.१५ दीवासांचे आत क्रीडा संकुलास
स्व. वसंतराव नाईक यांचे नाव न दील्यास अधिक तिव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीने दीला आहे.ह्यावेळी ...
जिल्हाध्यक्ष श्रीकांत माणिकराव घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, जिल्हा कोषाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य दादाराव पवार, युवा तालुका अध्यक्ष अमोल जामनिक,अक्षय राठोड, गोर सेना विदर्भ अध्यक्ष मनोहरभाऊ राठोड, अजय अरखराव, भारत निकोशे, माजी सभापती प्रकाश वाहुरवाघ, वैशालीताई
कांबळे, उज्वलाताई गडलिंग, गोबासेठ,जिल्हा संघटक समीर पठाण,मीडिया प्रमुख प्रषिक मोरे,सचिन शिराळे,आनंद खंडारे,जिल्हा उपाध्यक्ष ऍड सुबोध डोंगरे, निलेश इंगळे, ॲड मिनल ताई मेंढे संतोष वणवे,कृष्णा देवकुणबी, नितिन वानखेडे, प्रशिक रायबोले,बाळापूर तालुका अध्यक्ष संदीप वानखडे, पातूर तालुका अध्यक्ष चंद्रकांत तायडे, कोषाध्यक्ष अकोट तालुका नंदकिशोर मापारी,सरपंच तेजराव कळंब, ऋषिकेश खंडारे, उमेश गवई, रक्षक जाधव,मिलिंद दामोदर,धर्मेंद्र दांदी,विशाल दंदी,आकाश सावळे,मंगेश गवई,रणजीत तायडे, शीलवंत शिरसाट,मनोज तायडे,रणजीत शिरसाट,महेंद्र तायडे,विनय दाभाडे, प्रशिक इंगळे, प्रज्वल तायडे, नागेश डोंगरे, जतिन डोंगरे, राम लाहुळकार, भुषण खंडारे,रोशन चोटमल, रत्नपाल डोंगरे, रोशन इंगळे, सुरज इंगळे, अविनाश राठोड, संतोष गवई, रवी वाकोडे, अमोल वकील जामनिक, रतन अंभोरे, अनिल जामनिक, अरुण कांबळे, रोहन कांबळे, शैलेश शिरसाट, जनार्दन खिल्लारे, राजरत्न वानखडे, विश्वा खंडारे, करण गवई, राहुल इंगोले प्रामुख्याने उपस्थित होते.
क्रिडा संकुलाच्या नामकरणाचा शासन निर्णय आमदारांनी बदलून आणावा राजेंद्र पातोडे.
कुठल्याही क्रीडा संकुलास कुणाचेही नांव देण्यास मज्जाव करण्यात आला आहे.असा शासन निर्णय सरकारने केला आहे.तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष पद आमदार हरिश पिंपळे ह्यांच्या कडे असुन राज्यात त्यांचे पक्षाचे सरकार असुन आमदारांनी शासन निर्णय बदलुन आणावा अन्यथा युवा आघाडी स्वतः नामकरण करेल असा इशारा राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment