प्राचार्य डॉ मधुकर पवार यांना जनसामान्यांचा आधार.... प्राचार्य डॉ विजय नागरे....
प्राचार्य डॉ मधुकर पवार यांना जनसामान्यांचा आधार.... प्राचार्य डॉ विजय नागरे....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
स्थानिक बार्शिटाकळी गुलाम नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शिटाकळी येथील प्राचार्य मधुकरराव पवार समवेत उपप्राचार्य डॉ आर आर राठोड, श्री सतीश कापसे व श्री मुफीज खान यांचा सह पत्नी सत्कार व सेवानिवृत्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी मंचकावर डॉ मधुकरराव पवार त्यांच्या धर्मपत्नी हर्ष माला पवार, प्रा डॉ आर डी सीकची, प्रा डॉ विजय नागरे, उप प्राचार्य नरसिंह राठोड कळमेश्वर जी नागपूर, प्रा डॉ राजीव बोरकर संचालक विध्यार्थी कल्याण परिषद अमरावती विद्यापीठ अमरावती,संस्थापक सदस्य हरिश्चंद्र पवार आदी उपस्थित होते तेव्हा डॉ विजय नागरे यांनी आपल्या भाषणांमधून डॉ मधुकरराव पवार हे एक असामान्य व्यक्तिमत्व आहे त्यांनी बार्शीटाकळी सारख्या गावाला एक मोठं महाविद्यालय देऊन तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा शिक्षण घेण्याचा मार्ग त्यांनी सुखकर केला त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद डॉ मधुकर पवार यांच्या पाठीशी आहे असे विशद केले तेव्हा कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले डॉ आर डी सिकची कार्यक्रमाचे अध्यक्ष बार्शीटाकळी नगरपंचायत चे नगराध्यक्ष हाजी मेहफूज खान यांनी सुद्धा बार्शीटाकळी शहरातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना त्यांनी शिक्षणाची दालने खुले केली असे शिक्षण महर्षी मधुकरराव पवार हे फक्त कार्यमुक्त झालेले आहेत परंतु ते सदैव महाविद्यालयांशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मिळते जुळते राहतीलच असे मत व्यक्त केले तेव्हा मुफीज खान यांनी आपल्या मनोगतामधून महाविद्यालयाच्या स्थापनेपासून तर महाविद्यालयाचा झालेला विकासात्मक आराखडा आपल्या भावनिक शब्दातून त्यांनी व्यक्त केला तसेच यापुढेही महाविद्यालयाला आपण अविरत सेवा देत राहू तर सतीश कापसे यांनी आपल्या मनोगत मधून नोकरीला लागलो तेव्हापासूनच्या अनेक बाबी जणू त्यांनी ते उभचित्रच लोकांसमोर व्यक्त केलं अनेक मनोरंजनात्मक किस्से सांगत स्वतःही हसलेत आणि इतरांनाही हसवलं डॉ आर आर राठोड यांनी आपल्या मनोगत मधून महाविद्यालयाची पूर्वीची स्थिती आणि करावे लागलेले संघर्ष याचा उहापोह करत महाविद्यालयाचा विकास कसा झाला याचे विविध उदाहरणे देत महाविद्यालयाच्या समोर येणारी आव्हाने आणि करावयाचा विकास यावर आपले भाष्य त्यांनी व्यक्त केले यावेळी नवनियुक्त प्राचार्य तारेश आगाशे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करत त्यांनी पुढील सत्रामध्ये करावयाची कार्य आणि येणारी आव्हाने अशा विविध बाबींवर प्रकाश टाकत महाविद्यालयाचे विकासासाठी सदैव तत्पर राहील असे आवाहनही केले समाजशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ दीपक चौरपगार यांचे पाच विद्यार्थी मेरिट व एक गोल्ड मेडलिस्ट विद्यापीठातून आल्याबद्दल यांचा सत्कार व वाढदिवसही साजरा केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डी एस राठोड यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सिद्धार्थ वाघमारे व डॉ दीपिका जैन यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ दीपक चौरपगार यांनी केले या कार्यक्रमाला प्रा आदित्य पवार, डॉ प्रकाश सिंग राठोड, श्री प्रल्हादराव पवार, नव निर्वाचित उप प्राचार्य बी एस खान उपप्राचार्य अमित वैराळे तसेच संपूर्ण शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विध्यार्थी ,परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ विनोद उंडाळ व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी यांनी अथक परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी झाला.
Comments
Post a Comment