पावसामुळे कुरणखेड परिसरातील शेती पाण्याखाली..... ∆आमदार हरिशभाऊ पिंपळे यांनी केली पाहणी.....
पावसामुळे कुरणखेड परिसरातील शेती पाण्याखाली.....
आमदार हरिशभाऊ पिंपळे यांनी केली पाहणी.....
कुरणखेड मंडळ .दाळबी.कोळंबी मिर्झापूर या गावातील शेतीची पाहणी केली व तलाठी यांना सर्वे करण्याचे आदेश देण्यात आले तरी शेतकऱ्यांनी पठवारी यांना नेऊन सर्व्हे करून घ्यावे
कुरणखेड- अगोदरच कुरणखेड मंडळावर दुबार पेरणीचे संकट आले असता आता ता २१ व २२ झालेल्या जोरदार पावसामुळे या परिसरातील शेतीचा संपूर्ण भाग पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांची पिके डुबली आहेत
सध्या संपूर्ण महाराष्ट्र मध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यातच अकोला तालुक्यातील कुरणखेड मंडळातील शेतकऱ्यांच्या शेतीचा संपूर्ण भाग हा पावसाच्या पाण्याखाली येऊन दबला आहे अगोदरच या परिसरात शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली असताना सुद्धा आता त्रिबार पेरणी सुद्धा पावसाच्या पाण्याखाली बुडाल्याने शेतकरी यावर्षी मोठ्या संकटात सापडला आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची संपूर्ण शेती ही पावसाच्या पाण्याखाली असल्यामुळे शेतात पेरलेले सोयाबीनचे बियाणे तूर या पिकांना याचा मोठा फटका बसला आहे त्यामुळे शेतातील बी वाहून जाणे वर आलेले पीक पाण्याखाली दबले आहे
आज मुर्तीजापुर मतदार संघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी कुरणखेड मंडळा अंतर्गत येणाऱ्या कोळंबी मिर्झापुर पैलपाडा कुक्षणखेड गावात शेतामध्ये जाऊन प्रत्यक्ष शेतीची पाहणी करून शासन दरबारी हा मुद्दा आम्ही ठामपणे माडून सर्वे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची गवाही त्यांनी आज दिली यावेळी त्यांच्यासोबत कुरणखेडचे माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत पांडे भाजपाचे प्रशांत ठाकरे, भाजपा तालुका सचिव अमन महल्ले, किरण उमाळे, भाजपा जिल्हा सचिव सुयोग देशमुख, दुधलम उपसरपंच शंकरराव महल्ले, ताणखेड सरपंच अतुल घरडे,कोळंबी येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल बढे, माँ चंडिका आपत्कालीन बचाव पथक सदस्य तथा गावकरी शेतकरी यावेळी उपस्थित होते
Comments
Post a Comment