प्रा. डॉ. संतोष गायकवाड यांना पीएचडी प्रदान.....

प्रा. डॉ. संतोष गायकवाड यांना पीएचडी प्रदान.....
    

विशेष प्रतिनिधी श्रावण भातखडे 
इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेले विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, आपल्या दमदार भाषण शैलीने लौकिक मिळविलेले उत्कृष्ट वक्ते ,फुले -आंबेडकरी विचारधारेचे प्रचारक, *प्रा. संतोष मुरलीधर गायकवाड* यांना
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) ने* शिक्षण शास्त्र विषयाच्या अंतर्गत "A critical Study of mentoring project on the teaching of secondary school teachers of English of Auranga District" म्हणजे *"औरंगाबाद जिल्ह्यातील माध्यमिक शाळेच्या शिक्षकांवर इंग्रजीच्या प्रकल्पाच्या परिणामाचा आलोचनात्मक अभ्यास"* या विषयावर शासकीय अध्यापक महाविद्यालय औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर ) च्या माजी प्राचार्य डॉक्टर संजीवनी मुळे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी आपला प्रबंध विद्यापीठाला सादर केला होता. 
या प्रबंधावर त्यांना P.H.D. २५ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर करण्यात येऊन ७ ऑक्टोंबर २०२३ रोजी प्रदान करण्यात आली.
 प्राध्यापक संतोष गायकवाड हे *गंगापूर* जिल्हा *औरंगाबाद* येथील रहिवासी असून ते सध्या अकोला जिल्हा परिषदच्या अंतर्गत येणारे जि. प.कनिष्ठ महाविद्यालय अडगांव बु. येथे इंग्रजी विषयाचे अध्यापन करतात.
त्यांनी एस सी आर टी पुणे व राज्य आंग्ल भाषा संस्था औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) च्या इंग्रजी विषयाच्या विविध उपक्रमात आणि प्रकल्पात विशेष योगदान दिलेले आहे. इंग्रजी विषयाचे राज्य साधन व्यक्ती म्हणून त्यांनी कार्यही केलेले आहे. त्यांचे या यशा बद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे