अशोक कुबडे लिखित 'गोंडर' कादंबरीला विठ्ठल वाघ तिफन पुरस्कार प्रदान..

अशोक कुबडे लिखित 'गोंडर' कादंबरीला विठ्ठल वाघ तिफन पुरस्कार प्रदान...

_____________________________________
 👉ग्रामीण जीवनाचे अभ्यासक मा.भास्कर पाटील पेरे यांच्या हस्ते वितरण
👉उद्घाटकीय कार्यक्रमाला देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे, ज्येष्ठ अभिनेते मा.भारत गणेशपुरे यांची उपस्थिती.
________________________________________
'गोंडर' या बहुचर्चित कादंबरीला प्रतिभा साहित्य संघाचा "विठ्ठल वाघ तिफन" हा मानाचा पुरस्कार मेळघाट चिखलदरा अमरावती येथे ग्रामजीवनाचं यथार्थ चित्रण मांडणारे मा. भास्कर पेरे पाटिल,व्यंगचित्रकार गजानन घोंगडे,संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कुलट, माजी महापौर सुरेखा मॅडम, तसेच या साहित्य संमेलनासाठी उद्घाटकीय कार्यक्रमांमध्ये दैनिक देशोन्नतीचे मुख्यसंपादक प्रकाश पोहरे आणि प्रसिद्ध निवेदक कलाकार मा.भारत गणेशपुरे यांची उपस्थिती होती.हा सत्कार सन्मान अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये महाराष्ट्राच्या कश्मीर समजल्या जाणाऱ्या मेळघाट /सातपुडा पर्वत असलेल्या चिखलदरा या अमरावती जिल्ह्यातील नयनरम्य ठिकाणी सुंदर कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. चिखलदरा हे ठिकाण जमिनीच्या सपाटीपासून प्रचंड उंचीवर आहे. परतवाडा शहरापासून चिखलदरा कडे जायला जेव्हा सुरुवात होते.. तर जमिनीपासून 25 ते 30 किलोमीटर केवळ घाटाचा मार्ग पार करावा लागतो..प्रचंड माळ,घाट, पहाड मोठ्या मोठ्या दऱ्या जंगली जानवर तसेच पहाडातून नितळ वाहणारा निर्मळ झरा थोडक्यात तर जमिनीवरला स्वर्ग म्हणायलाही हरकत नाही..असा या स्वर्गासम सुंदर पर्यटन असलेल्या ठिकाणी हा अतिशय सन्मानाचा विठ्ठल वाघ तिफन पुरस्कार गोंडर कादंबरीला प्रदान करण्यात आला.ज्यांच्या नावे पुरस्कार देण्यात आला तेही ग्रामीण कवी ज्या परिसरात देण्यात आला ती ही माळराणाने आदिवासी असलेला भाग एवढेच नाही तर ज्यांच्या हस्ते देण्यात आला तेही ग्रामीण जीवनाचं यथासार चित्रण करणारे ग्रामीण भागाचा विकासाचा ध्यास घेणारे आणि सबंध महाराष्ट्राला त्यांच्या बोली भाषेतून ओढ लावणारे भास्कर पेरे पाटील या सर्व ग्रामीण जीवनाशी संबंधित असलेल्या बाबी यामध्ये ग्रामीण जीवनाचं चित्रण करणाऱ्या गोंधळ कादंबरीला हा पुरस्कार यांच्या हस्ते देण्यात आला. हा खरोखरच खूप महत्त्वाचा सन्मान 'गोंडर' कादंबरीसाठी आहे. इतक्या उंचीवर या कादंबरीचा सन्मान होणे खरोखरच गोंडर या कादंबरीने मला खूप निसर्गामय वातावरणात नेऊन सन्मान दिला.. हा माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा सन्मान असं मी मानतो. यावेळी संचालन वृषाली देवकर/परतवाडा यांनी केले.. यावेळी माझ्या परिचयाचे कवी कट्टा चळवळीतील अनेक लोक या सभागृहात सहभागी बाहेर ज्यांच्या भेटी झाल्या.. त्यामध्ये माननीय देवकर सर,माननीय दिलीप काळे, मिस लीना,गजानन मते, शालिनी बेलसरे,ज्ञानेश्वर शिंदे आणि सोपानराव देगावकर सोबत होते 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे