विदर्भातील सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रमा म्हणजे लुटीचा अजेंडा - राजेंद्र पातोडे.
विदर्भातील सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रमा म्हणजे लुटीचा अजेंडा - राजेंद्र पातोडे.
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : विदर्भातील ४७ सिंचन प्रकल्पांना आज १८ हजार ३९९ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांच्या माध्यमातून विदर्भातील एकूण २ लाख २३ हजार ४७४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले असले तरी अश्या अनेक प्र.मा., सु.मा. आणि वि.मा. घेवून सिंचनाचे नावावर मंत्री अधिकारी ह्यांनी स्वतःची घरे भरली आहेत.त्यातून विदर्भाचे सिंचन प्रकल्प पुर्ण झाले ना,सिंचन अनुशेष भरुन निघाला, ना शेतकरी सुखी झाला, निर्माण केलेल्या धरणात पिण्याचे पाणी देखील पुरेसे उपलब्ध होऊ शकले नाहीत.आजही गावे आणि शहरे तहानलेली आहेत.प्रादेशिक पाणी पुरवठा योजना जोक बनल्या आहेत.त्यामुळे जलजीवन मिशनच्या नावावर गावोगावी पाणी पुरवठा योजना साठी कोट्यवधी रुपये खर्च करून देखील पाणी उपलब्ध नाही.
२ लाख २३ हजार ४७४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याची लोणकढी थाप असून हा सिंचनाच्या नावावर लुटीचा अजेंडा घेऊन प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.आधीच्या सिंचन घोटळ्याचा अनुभव असलेले अर्थमंत्री असल्याने जिल्हा जिल्हयातील पदाधिकारी ह्यांना गाड्या पुरविण्यासाठी ही प्रमा देण्यात आली असावी अशी शंका देखील वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे ह्यांनी व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment