श्री.अब्दुल सुबुर खान यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न....
श्री.अब्दुल सुबुर खान यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शीटाकळी: स्थानिक बाबासाहेब धाबेकर विद्यालयाचे उपमुख्याद्यापक श्री. अब्दुल सुबुर खान यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. गजेंद्र काळे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक तौकीर खान यांची उपस्थिती होती.
या वेळीं सत्कारमूर्ती अब्दुल सूबुर खान यांचा मुख्याध्यापक श्री .गजेन्द्र काळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सय्यद शकील यांनी केले तर सूत्रसंचालन सुनील कडू यांनी केले. सय्यद असदअली,साहेबराव शिंदे ,अनिल गवळी,आरिफ सर, रक्षा जाधव ,सोनाली पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणामध्ये गजेंद्र काळे यांनी सुबूर खान यांच्या शैक्षणिक कार्याची प्रशंसा करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पर्यवेक्षक तौकीर खान यांनी केले .यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment