सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ विमल डोंगरे यांना 2024 चा कार्यगौरव पुरस्कार

सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ विमल डोंगरे यांना 2024 चा कार्यगौरव पुरस्कार 

 बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : अकोला तालुक्यातील माझोड येथील स्वामी विवेकानंद ग्रूप ऑफ ऑर्गनाईजेशन माझोड ग्रूप च्या दशकपूर्ती सोहळा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ विमल शिवचरण डोंगरे 
  यांना 2024 चा स्वामी विवेकानंद ग्रूप चा कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी पुरस्काराचे मानकरी संजय देशमुख,हिम्मत धाळे ,विशाल राखोंडे,गजानन काळे यांचा सुद्धा समावेश आहे .स्वामी विवेकानंद ग्रूप ऑफ ऑर्गनायजेशन गेल्या 10 वर्षापासून शैक्षणिक , सामाजिक कार्यात अग्रेसर राहून काम करीत आहे त्यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये गाव तेथे वाचनालय ही संकल्पना घेऊन गावागावात पुस्तक वितरण, आणि बरेचश्या गावात वाचनालय सुद्धा सुरू करण्यात आली ग्रूप चे अध्यक्ष प्रा.राजेश पाटील ताले व त्यांची संपूर्ण टीम त्यांचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त विद्यार्थांना वाचन करावे आणि वाचन करून शिक्षित व्हावे असे त्यांचे मत आहे सर्वप्रथम कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांच्या हस्ते राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ तसेच युगपुरुष स्वामी विवेकानंदजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर डॉ.रणजित सपकाळ संचालक महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, डॉ.विनीत हिंगणकर संचालक ओझोन हॉस्पिटल, डॉ.अमोल रावणकार प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ,जागतिक पातळीवर मोटिवेशन करणारे तथा अस्पयर इन्स्टिट्यूट चे संचालक सचिन बुरघाटे ,संचालक हुशे ज्वेलर्स संतोष हुसे , अध्यक्ष श्रीमती सुमीत्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय कृष्णाभाऊ अंधारे, जिल्हाध्यक्ष युवासेना नितीन पाटील मानकर यांनी ग्रूप चे दहा वर्षाचे कार्य कसे सुरू आहेत याबाबत आपले मत व्यक्त केले त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातुन स्वामी विवेकानंद ग्रुपचे अध्यक्ष राजेश पाटिल ताले यांनी गृपच्या १० वर्षाच्या कार्याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वामी विवेकानंद ग्रुप चे अध्यक्ष राजेश ताले,उपाध्यक्ष प्रतिक ताले,वैभव खंडारे,भुषण ताले,शिवहरि लाहुडकार,राहुल ताले, मयुर ताले,वैभव बंड, श्रीकृष्ण हनवते,प्रणव ताले,सोपान ताले, शिवम घोगरे,योगेश महल्ले, ई. प्रयत्न केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राजेश पाटिल ताले, संचालन कोमल मते तर आभारप्रदर्शन प्रतिक ताले यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे