डॉ. सै. गरीब उर्दु प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेत सामान्य ज्ञान स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न....
डॉ. सै. गरीब उर्दु प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेत सामान्य ज्ञान स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : बेरार तालीमी कारवा व डॉ सैय्यद गरीब उर्दू शाळा बार्शिटाकळी यांच्या संयुक्त विद्यमाने सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री खान मोहम्मद अजहर हुसेन साहेब, प्रमुख उपस्थिती मध्ये बार्शिटाकळीचे नगराध्यक्ष हाजी महेफूज खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोंगरदिवे साहेब , संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक सैय्यद जहागीर , जेष्ठ नेते सैय्यद मीर साहेब , अहमद सेठ उपस्थीत होते
या कार्यक्रमात २० विद्यार्थाना प्रमाणपत्र व शिल्ड व पुच्छ गुच्छ देऊन पुरस्कार वितरीत करण्यात आले या कार्यक्रमासाठी असद खान , मोहम्मद शोहेब , शेख अजहर, सैय्यद असद अली , अय्युब खान , रईस शेख व मुखाध्यापक व शिक्षक व पालक वर्ग उपस्थित होते
Comments
Post a Comment