ग्रामपंचायत सरपंच सदस्याचे क्षमता बांधणी प्रशिक्षण बार्शिटाकळी येथे संपन्न अभिसरणाच्या माध्यमातुन शास्वत विकास साधावा - सत्र समन्वयक सुधीर सरकटे
ग्रामपंचायत सरपंच सदस्याचे क्षमता बांधणी प्रशिक्षण बार्शिटाकळी येथे संपन्न अभिसरणाच्या माध्यमातुन शास्वत विकास साधावा - सत्र समन्वयक सुधीर सरकटे
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत बार्शिटाकळी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्यांचे प्रशिक्षण यशदा पुणे जिल्हा परिषद अकोला व पंचायत राज प्रशिक्षण केंद्र अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृह बार्शिटाकळी येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्राचार्या शितल मेटकर, निर्देशक नागसेन बागडे, गटविकास अधिकारी ताणी साहेब, सहाय्यक गट विकास अधिकारी सुनिता इंगळे मॅडम ,विस्तार अधिकारी रमेश चव्हाण साहेब दिपक इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली सत्र समन्वयक सुधीर सरकटे यशदा प्रशिक्षक रोहिदास भोयर, गणेश पोटे, विशाल बकाल किरण हिवराळे यांनी गावाचा पर्यायाने ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळतांना उपयुक्त ठरणारी माहिती क्षमता बांधणी प्रशिक्षणाच्या माध्यमातून देण्यात येत असताना कार्यात गतिमानता येण्याकरिता सरपंच उपसरपंच सदस्यांचे कौटुंबिक, सामाजिक, राजकीय तसेच वैयक्तिक स्तरावरील योगदान असण्याकरिता दि. 19/01/2024 ते 21/01/ 2024 ला पंचायत समिती सभागृह बार्शिटाकळी येथे तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाच्या उद्धाटना करीता अरूणा सोळंके सरपंच वाघजाळी , शंकर महल्ले निंबी बु. सरपंच,वर्षा राठोड देवदरी सरपंच , अरविंद जाधव सरपंच चेलका, सुधीर सरकटे,किरण हिवराळे, गणेश पोटे इतर ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, उपसरपंच उपस्थित होते. या प्रशिक्षणामध्ये ग्रामपंचायत चे कामकाज मासिक सभा, ग्रामसभा महिला सभा व सभेच्या वेळेचे व्यवस्थापन, शास्वत विकासाचे उद्वीष्टे, सरपंच सदस्य पदाचे अधिकार ग्रामपंचायत लेखा संहिता 2011 व सामाजिक लेखापरीक्षण व्यक्तिमत्व विकास, लोकसहभागातून ग्रामविकास, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ठळक तरतुदी, सरपंच उपसरपंच सदस्य पदाचे अधिकार कर्तव्य व जबाबदारी, जलसाक्षरता, पाण्याचे ताळेबंद, घनकचरा व्यवस्थापन, नेतृत्व गुण, गाव विकासाची दृष्टी, आमचा गाव आमचा विकास, 15 वित्त आयोग, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, गाव विकास विविध समित्या, खरेदी प्रक्रिया, आपत्ती व्यवस्थापन, ग्रामपंचायतच्या उत्पन्नाचे बाबी, अंदाज पत्रक, 1 ते 33 नमुने, मानव विकास निर्देशांक, आदर्श गाव संकल्पना चित्रफित दाखवून यावर चर्चा करण्यात आली असून इत्यादी विषयाची सविस्तर अशी माहिती या प्रशिक्षणात देण्यात आली या प्रशिक्षणा मध्ये देवदरी,चिंचोली रूद्रायणी, साखरविरा, चेलका, तिवसा बु, निंबी खु. निंबी बु,जलालाबाद, जामवसु, देवदरी, अजनी बु, वाघजाळी,राजनखेड, इत्यादी ग्रामपंचायत सदस्य या प्रशिक्षणाला उपस्थित होते या प्रशिक्षणाच्या समारोपा करीता पंचायत समिती उपसभापती संजय चौधरी, माजी सभापती प्रकाशजी वाहुरवाघ, पं. स. सदस्य रामदास घाडगे, दादाराव पवार, गजाननभाऊ मनतकर उपस्थित असुन दिनांक 21 जानेवारी रोजी समारोप करण्यात आला असुन प्रशिक्षणार्थींना उपयुक्त असलेली माहिती पुस्तिका व प्रमाणपत्र देण्यात आले संचालन सुधीर सरकटे यांनी केले असून आभारप्रदर्शन किरणताई हिवराळे यांनी मानले.
Comments
Post a Comment