बार्शिटाकळी येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा...

बार्शिटाकळी येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा...
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : शहरात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . 
आज दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी शहरातील विविध शासकीय कार्यालयात तथा सामाजिक व राजकीय मंडळींनी मोठ्या उत्साहाने 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला यामध्ये नगरपंचायतला प्रशासक तथा प्र. मुख्याधिकारी विजय लोहकरे , बाबासाहेब धाबेकर विद्यालय , सावित्रीबाई फुले विद्यालय, गुलाम नबी आझाद महाविद्यालय, पोलीस स्टेशन बार्शिटाकळी येथे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती तदनंतर सकाळी ९:१५ मिनिटांनी स्थानिक तहसील कार्यालयात तहसीलदार दीपक बाजड यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले . यावेळी पोलीस उपनिरीक्षक निलेश तारक व त्यांच्या सहकाऱ्यांनी मानवंदना दिली यावेळी प्रमुख उपस्थितीत माजी आमदार ज्ञानदेवराव ठाकरे , निवासी नायब तहसीलदार श्रीमती हर्षदा काकाड, महसूल नायब तहसीलदार आर बी, डाबेराव, निवडणूक ना. तहसीलदार विनोद पाचपोहे, संजय गांधी नि.योजना नायब तहसीलदार श्री मात्रे त्याचा सर्व अव्वल कारकून महसूल सहाय्यक,  मंडळ अधिकारी , तलाठी , शिपाई,  कोतवाल , वाहन चालक महोकार, बार्शिटाकळी तालुक्यातील सर्व गणमान्य नागरिक,  पत्रकार बांधव , पोलीस कर्मचारी,  शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
  सूत्रसंचालन श्रीमती निलुताई सराटे यांनी केले तर उत्कृष्ट रांगोळी सुनीता डुकरे व दिपाली रिसोडकर या कोतवाल भगिनींनी रेखाटली कार्य... यशस्वीतेसाठी  सूरेश हिवराळे,  संतोष व्यवहारे , कैलास शेळके, अनिल चहाकर यांनी परिश्रम घेतले नायब नाझर अमोल बेलखेडे यांच्या नियोजनात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सोहळा मोठ्या हर्ष उत्साहात पार पडला 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे