बार्शिटाकळीच्या जि. प. उर्दू कन्या शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात....

बार्शिटाकळीच्या जि. प. उर्दू कन्या शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : स्थानिक जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळेत १८ जानेवारीला आनंद मिळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या मेळाव्याचे उद्घाटन शाळेतील दिव्यांग विद्यार्थी अक्सीम खान अरिफ खान व अलविना आयात यांच्या हस्ते करण्यात आले . 
बाल आनंद मेळाव्याचे आयोजन बार्शिटाकळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कालिदास तापी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बार्शिटाकळीच्या सभापती सुनंदा मानतकर तर प्रमुख उपस्थिती म्हणून उपसभापती संजय चौधरी , विस्तार अधिकारी प्रमोद जानोरकर , केंद्रप्रमुख शफिक अहमद खान,  शिक्षक नेते अरुण धांडे , माजी केंद्रप्रमुख शाहिद इक्बाल खान, मुख्याध्यापक राहुल्हा खान , शरद राठोड,  निलेश बनसोडे, मुख्याध्यापक अक्तर उल अमीन हे होते प्रास्ताविक मुख्याध्यापक रिजवानोद्दीन काजी यांनी केले विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच व्यवहारिक ज्ञान प्राप्त व्हावे व त्यांची व्यवसायिक कौशल्य विकसित व्हावे याकरिता शाळेत बाल आनंद मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले होते वर्ग एक ते पाचच्या विद्यार्थ्यांनी विविध साहित्याची दुकाने लावली होती कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन व नियोजनाकरिता मुख्याध्यापक काजी रिजवानोद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक मो. खलील मो.शाकिर, हिना अफरोज, सलमा सुलताना,   अंजुमन बानो,  आदींनी परिश्रम घेतले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकाऱ्यांची ही उपस्थिती होती

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे