अवैध धंदे बंद करण्याची मागणी वंचित युवक आघाडीने बार्शीटाकळी पोलीस निरीक्षकांना निवेदन.....
अवैध धंदे बंद करण्याची मागणी वंचित युवक आघाडीने बार्शीटाकळी पोलीस निरीक्षकांना निवेदन....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शीटाकळी : मंगळवार 23 जानेवारी रोजी वंचित बहुजन युवा आघाडीचे बार्शिटाकळी तालुकाध्यक्ष अमोल जामनिक, महिला शहराध्यक्षा सुनीता धुरंधर, तालुका महासचिव अक्षय राठोड व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांना निवेदन देण्यात आले. ज्यामध्ये बार्शिटाकळी तालुक्यातील सर्व गावांमध्ये देशी-विदेशी, गावरान दारू, झन्ना-मन्ना, पाटा आणि पट्टा का डाव, ऑनलाइन मटका, कल्याण-मुंबई-वरळी मटका, पेट्रोल, गुटखा पुडीचे अवैध उत्खनन सुरू असल्याचे सांगण्यात आले. गांजा आदी अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे गावातील लहान मुले व तरुण व्यसनाधीन झाले आहेत. या अंमली पदार्थाच्या व्यसनामुळे घराघरात रोज मारामारी होत असून त्यामुळे महिलांचे जगणे विस्कळीत होत आहे.
अवैध धंदे करणाऱ्या धंदे वाल्यांना गावातील नागरिक समजाविण्यास गेल्यास अवैध धंदेवाल्याकडुन सर्व सामान्य जनतेला दहशत पसरवीली आहे. पोलीस आमचे काहीच वाकडे करू शकत नाहीत असे सांगुन नागरीकांना परेशान करीत आहेत. याकरिता बार्शिटाकळी तालुक्यात पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील अवैध धंदे बंद करण्यात येऊन बार्शिटाकळी तालुक्यात कायद्याचे राज्य निर्माण करुन सर्व सामान्य जनतेला न्याय देण्यात यावा अवैध धंदे बंद न केल्यास वंचित बहुजन युवा आघाडी तीव्र आंदोलन करेल या आंदोलना दरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडल्यास शासन जबाबदार राहील. निवेदन देताना
तालुकाध्यक्ष अमोल जामनिक, अक्षय राठोड, दादाराव पवार प.स.सदस्य,अजय अरखराव, श्रीकृष्ण देवकुणबी, महिला शहराध्यक्षा सुनिता ताई धुरंधर, रक्षक जाधव, सनि धुरंधर, निकी डोंगरे, राजकुमार खाडे, सचिन गोपनारायण, अक्षय सरकटे, अरूण काबळे, संघर्ष खडे, महादेव गोरे, योगेश भगत, अंकुश खडे, सिद्धार्थ जामनिक, जय खाडे, सुरज इंगळे, छाया जाधव, कमीना राठोड, ज्योती जाधव, केशर विजयशिग चव्हाण, रोहिदास राठोड, वंचित बहुजन युवा कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
[चौकट]
अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकांना पोलीस प्रशासनाचा धाकही नाही.या व्यावसायिकांनी सर्वसामान्यांमध्ये दहशत पसरवली आहे. की पोलीस आमचे काहीही करू शकत नाहीत.
ग्रामीण
[चौकट]
पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करून तालुक्यातील सर्व गावांमध्ये सुरू असलेले अवैध धंदे बंद करावेत.अवैध धंदे बंद न झाल्यास वंचित बहुजन युवा आघाडी तीव्र आंदोलन करेल.कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास प्रशासनाचा निषेध करण्यात येईल. जबाबदार धरले.
सुनीता धुरंधर
महिला शहर अध्यक्षा बार्शिटाकळी
[चौकट]
तालुक्यात अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. या अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाला ग्रामस्थांच्या सहकार्याची गरज असून, नुकतीच ग्रामस्थांच्या जनजागृतीमुळे साकरविरा गावात मोठी कारवाई करून दारूबंदी करण्यात आली. लवकरच जनजागृती मोहीम राबवून अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांना आळा बसणार आहे.
शिरीष खंदारे पोलीस निरीक्षक बार्शीटाकळी
Comments
Post a Comment