प्रभु श्रीराम यांची भव्य दिव्य शोभायात्रा बार्शिटाकळी शहरात संपन्न....
प्रभु श्रीराम यांची भव्य दिव्य शोभायात्रा बार्शिटाकळी शहरात संपन्न....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : रामजन्मभूमी तिर्थक्षेत्र अयोध्या धाम येथे श्रीराम नवनिर्माण मंदिरामध्ये प्रभु श्रीराम यांच्या मुर्तीसह श्रीराम, लक्ष्मण,भरत,क्षतृगुण, रामभक्त हनुमानजी यांच्या रामदरबारात मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अवचित्त साधुन दिनांक २२ जानेवारी २०२४ ला ऐतिहासिक संतांच्या वास्तव्याने पावन असलेली नगरी मा कांलका देवीच्या खोलेश्वर नगरी मध्ये महाप्रसाद व महाआरती व भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली हि शोभायात्रा संपुर्ण बार्शिटाकळी शहर तसेच बार्शिटाकळी तालुक्यांच्या वतीने करण्यात आली. हि शोभायात्रा हजारोच्या संख्येने रामभक्त उपस्थित होते.
या शोभायात्रेत हे.भ.प. नामदेव महाराज शिंदखेडराजा व मेहकर येथील टाळकरी व मृदगाचार्य सांप्रदायिक भजन दिंडी , गजानन नगर मधील गुरूदेव महिला भजनी मंडळ, यां सोहळ्यात होते. हिवरा आश्रम येथील चांदीचा रथ व त्या रथा मध्ये राम, लक्ष्मण,सिता, हनुमान यांच्या वेशभूषा धारण करून रथामधे विराज मान होते
त्यांच्या विलोभनीय देखाव्याने शहरातील नागरिक तसेच महिला भाविक झाले होते. तसेच छोट्या श्रीराम, लक्ष्मण,सीता यांच्या वेषभुषेत असलेले बालकलाकार नागरिकांचे आकर्षण ठरले.
बार्शिटाकळी मधील प्रत्येक वेटाळ सोमवार पेठ,तेलीपुरा, वंजारी पुरा, गजानन नगर, राम नगर, भावसार पुरा, सोनगीर झोपडपट्टी, ओम शांती नगर, गंगा नगर, साईनगर, माळीपुरा , ढोरे वेटाळ, काळा मारोती चौक, न्हावी पुरा, शिवाजी चौक, अन्नाभाऊ साठे नगर, व संपूर्ण शहरातील व महिला भजनी मंडळ यांचा व द ग्रेट मराठा शिवगर्जना युवक मंडळ व तरूण युवकांनी हिरीरीने सहभाग घेतला होता यावेळी बार्शिटाकळी शहरात शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. या शोभायात्रेत बायपास चौका मध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच संकट मोचन हनुमान मंदिर पोळा चौक या ठिकाणी शोभायात्रेचे पुजन करून स्वागत करण्यात आले, संताजी नगर तेलीपुरा व गवारी पुरा येथील शुभुसेना मॉ तुळजाभवानी दुर्गा उत्सव मंडळ व संताजी नगर तेलीपुरा यांच्या माध्यमातून चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती व येथेच राम जन्मभूमीच्या अयोध्या येथील शिलान्यासाच्या करीता गेलेले कारसेवक यांचा सत्कार घेण्यात आला भास्कर ग्याने, रमेश देशमुख, विनोद भुजबळ,छोटुभाऊ करपे, जगन्नाथ कुचर, या कारसेवकाचा सत्कार करण्यात आला.बाजार लाईन विठ्ठल मंदिर येथे समितीच्या वतीने कारसेवकाचा सुध्दा सत्कार करण्यात आला तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्व दत्तात्रय कव्हळकर ह.प.ह.गोपालकृष्ण क्षिरसागर महाराज, स्व. गोपाळराव देशमुख, स्व. पाल्हाद शेठ धाईत, स्व. भिकाजी आखाडे यांनी केलेल्या कार्याचा गुणगौरव करून द ग्रेट मराठा मधील तरुणांनी शिवगर्जनेसह श्रीराम यांच्या जयघोषा करण्यात आला व तेथुन शोभायात्रा श्रीराम मंदिर येथे महाआरती करून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले व यावेळी संपूर्ण बार्शिटाकळी परिसरातील १० हजार रामभक्तांनी महाप्रसाद घेतला या शोभायात्रे मुळे बार्शिटाकळी शहर राममय झाले होते अशी माहिती संकट मोचन हनुमान मंदिरांचे अध्यक्ष दिनेश रत्नपारखी यांनी दिली
Comments
Post a Comment